Monday , August 17 2026
Breaking News

“मराठी असेल तिथे व्यापार करा” आवाहनानंतर शुभम शेळके यांच्याविरोधात गुन्हा

Spread the love

 

बेळगाव : “मराठी असेल तिथे व्यापार करा” असे आवाहन केल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते शेळके यांच्याविरोधात टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आवाहनामुळे भाषिक तेढ निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेळके यांनी भारतीय संविधानातील कलम 19(1)(अ) अंतर्गत प्रत्येक नागरिकाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार असल्याचे नमूद केले. बोलणे, लेखन, सामाजिक माध्यमांवरील पोस्ट, बॅनर अथवा इतर माध्यमांतून विचार व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने प्रदान केल्याचे त्यांनी सांगितले.

“सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांनाही हेच घटनात्मक अधिकार समानपणे लागू होतात का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या विषयावर सार्वजनिक चर्चा होण्याची आवश्यकता व्यक्त केली. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण आणि त्यांची समान अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.

“मराठी असेल तिथे व्यापार करा” या आवाहनातून भाषिक भावना भडकवल्याचा आरोप करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सीमाभागातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व विश्वभारत सेवा समितीचे दुसरे बालकवी संमेलन 18 ऑगस्टला

Spread the love  बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *