Tuesday , August 18 2026
Breaking News

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये येथील अग्निशामक दलातर्फे अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. आणीबाणीच्या प्रसंगी आग आटोक्यात आणण्यासाठी आणि सुरक्षित बाहेर पडण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे होत्या.
प्रारंभी आगीची कारणे, धोके आणि प्रतिबंध याविषयीच्या मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये आग विझवण्याच्या साधनांचा प्रत्यक्ष वापर आणि सुरक्षित स्थलांतराची पूर्वतयारी कशी करावी हे सांगण्यात आले. अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिकामध्ये आगीचे विविध प्रकार आणि उपाययोजना यांची माहिती अग्निशमन दलाचे हवालदार उदय पतन यांनी दिली. आग लागल्यास त्वरित योग्य पद्धतीचा वापर करून आग कशी विझवावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यामध्ये अग्निशमन दलाचे महेश माळगेमनी, बी. एस. बजंत्री, देवेंद्र राठोड, अजित कनगलावर, विशाल पुजारी सहभागी झाले होते. अग्निसुरक्षा प्रात्यक्षिकामध्ये मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांच्यासह शिक्षकांनी सहभाग घेतला. शिवाय अग्निशमन दलाच्या अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिकांचा विद्यार्थी, शिक्षकानी थरारक अनुभव घेतला. उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *