निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील
शिवराज विद्यासंकुलचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे उपस्थित होते.
यावेळी ‘स्वयंभू यशवंतराव घाटगे: संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर…’ या पुस्तकासह आपली वीस पुस्तके ग्रंथालयास भेट दिली. प्रा. कुराडे यांनी, आरक्षण, शिक्षण, अनिष्ट प्रथा निर्मूलन आणि बहुजन उद्धारासाठी शाहू महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. कला आणि कलाकारांचे ते आश्रयदाते असल्याचे सांगितले. प्रा.डाॅ.अच्युत माने यांनी, शाहू महाराज हे क्रांतिकारी लोकराजे होते. शेतकरी, दलित, बहुजन समाजातील इतर जातीसमूह या सर्वांना सुधारण्यासह प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार व कार्य आजच्या व्यवस्थेला प्रेरक व मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नेहल चव्हाण यांनी शाहू महाराजांचा कार्याचा आढावा घेतला. सुशील कांबळे यांनी शाहू महाराजांवरील कविता सादर केली. जयसिंगपूरचे आण्णासाहेब क्वाणे यांनी शाहू महाराजांची थोरवी आपल्या भाषणातून विशद केली. प्रा आनंद संकपाळ यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास सुधाकर माने, वसंत जाधव, प्रा. शिवाजी मोरे, प्रा. डाॅ. अशोक डोनर, प्रा. नानासाहेब जामदार, कबीर वराळे, प्रा. मंगलदास शिप्पूरकर, बाळासाहेब घस्ते, प्रा. प्रवीणसिंह शिलेदार, उदय चव्हाण, जयराम मिरजकर, चंद्रकला संकपाळ, उदय वंटे, पांडुरंग कांबळे, अरुण कांबळे, राजेश पोटजाळे, धनंजय खामकर, प्रताप पाटील यांच्यासह शाहूप्रेमी उपस्थित होते. ग्रंथपाल गोरखनाथ मधाळे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta