Wednesday , August 19 2026
Breaking News

शनिवारच्या शाळेच्या वेळेत मोठा बदल; आता सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंतच वर्ग

Spread the love

 

बेळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने शाळांच्या शनिवारच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी शाळा सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेतच भरविण्यात येणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी शाळांच्या वेळेत मोठी तफावत होती. काही शाळा सकाळी ७.४५ ते ११.४५, काही ८ ते १२, तर काही ९ ते १ या वेळेत चालत होत्या. ही विसंगती दूर करून राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू करण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने हा निर्णय घेतला आहे.

विभागाच्या आदेशानुसार संबंधित सर्व शाळांनी नव्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. शनिवारी अर्धा दिवस शाळा भरत असली तरी आता सर्वत्र एकाच वेळेनुसार अध्यापन होणार आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून शाळांमधील वेळापत्रकात एकसमानता येणार असल्याने शिक्षण व्यवस्थापन अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Spread the love विधानसभेत, विधान परिषदेतही गदारोळ बंगळूर : वाल्मीकी विकास महामंडळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *