Monday , August 17 2026
Breaking News

खचलेल्या सेवा रस्त्याला तळ्याचे स्वरूप

Spread the love

 

पुणे-बंगळूर महामार्गालगतची स्थिती; नागरिकासह वाहनचालकांची कसरत

निपाणी (वार्ता) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. पण सेवा रस्त्याच्या दर्जाहीन व नियोजनशून्य कामातील त्रुटी आता प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. निपाणी परिसरातील अनेक ठिकाणी सेवा मार्ग खचला असून पावसाळ्यात या रस्त्यावर तुडुंब पाणी साचत असल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण झाला आहे. या समस्येचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिकांसह दुचाकी सरांना बसत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महामार्गाचे काम करताना सेवामार्गाच्या बांधकामात योग्य नियोजन न केल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक निचऱ्याची व्यवस्थाच नाही.
त्यामुळे शेतात पाणी शिरत आहे. सेवा मार्गावरही पाणी साचत असल्याने रस्त्यावरील खड्डे आणि खचलेले भाग दिसून येत नाहीत. त्यामुळेअपघाताचा धोका वाढत आहे.
सहापदरीकरणानंतर अनेक ठिकाणी सेवा मार्गच उपलब्ध नसल्याने नागरिकांना थेट महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ज्या ठिकाणीसेवा मार्ग आहे, तेथेही तो खराब अवस्थेत असल्याने त्याचा उपयोग होण्याऐवजी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
——————————————————————–
यंत्रणांनी वेळीच घ्यावी दखल
दर्जाहीन काम व नियोजनाचा अभाव यामुळे पुणे-बंगळूर महामार्गालगतचा सेवा मार्ग आता नागरिकांसाठी सुरक्षिततेऐवजी संकटाचे कारण ठरत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी वेळीच दखल घेऊन सेवा मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकासह वाहनधारकातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *