Saturday , August 29 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे रक्षाबंधन सण साजरा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न आणि उपाध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री. सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रथमेश पूजन झाले सुजाता जाधव, विद्या कमते, शुभांगी घुमटनावर, पूजा वडेर, प्रीतल चौगुले, माधुरी हिरेमठ, या महिला भगिनींनी डॉ. सी. बी. कुरबेट्टी, किशोर बाली व ज्येष्ठ संचालक डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमने, प्रताप पटनशेट्टी, महेश बागेवाडी, सुरेश शेट्टी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील , सीईओ एस के अदनावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, सुरज घोडके, महादेव बडीगेर, चंद्रकांत हणबर व उपस्थित कर्मचारी वर्गांना राखी बांधून भाऊ बहीणीमधील अतुट, नाते जपणारा व प्रेमाचा धागा बांधून रक्षाबंधन साजरा केला. कार्यक्रमास महिला संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या. सन्मती भिकरणावर यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब मंगसुळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

नूतन मराठी विद्यालयामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *