बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई राज्यातील फ्रंटलाईन कामगारांसाठी कोविड बुस्टर डोस मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी बुधवारी सांगितले की, केंद्र सरकारचे मत याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आरोग्य आणि आघाडीच्या कामगारांना अँटी-कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याच्या मुद्द्यावर झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची स्थिती जाणून घेऊन राज्यातील तज्ञांनी अनुकूलता व्यक्त केली असल्याने …
Read More »LOCAL NEWS
सर्व देशातील प्रवाशांची कर्नाटकात चाचणी, क्वॉरंटाईन
तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय : रोज 2500 विदेशी प्रवाशी बंगळूरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या सूचनेनुसार, राज्य कर्नाटकात येणार्या सर्व देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड-19 चाचणी करेल. याआधी, ज्या देशांत ओमिक्रॉन व्हेरियंट सापडला आहे अशा देशांतील प्रवाशांसाठी अनिवार्य आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. …
Read More »शहीद जवानाच्या कुटुंबियांचे आंदोलन!
बेळगाव : लष्करात सेवा बजावणार्या शहीद जवानाच्या कुटुंबाला राज्य सरकारने दोन एकर जमीन दिली आहे. मात्र त्याचा फायदा घेण्यासाठी आम्हाला एनओसीची गरज आहे. जिल्ह्यातील तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्षभरापासून आमचा छळ करत असल्याचा आरोप शहीद जवानाच्या कुटुंबियांनी केला आहे. सौंदलगा गावचे संजय वसंतराव देसाई भारतीय सैन्यात श्रीलंकेत सेवा बजावीत …
Read More »बेपत्ता मुलगा सापडला सुखरूप चिखलात!
विजापूर : घरातून बेपत्ता झालेला मुलगा दुसर्या दिवशी चिखलात पण सुखरूप सापडल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावात घडली. मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावातील संतोष मादर हा बालक कालपासून घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे चिंतेत होते. संतोष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ …
Read More »गरीब विद्यार्थ्यांचे 19.75 लाख रुपये शैक्षणिक शुल्क सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने भरले!
बेळगाव : बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या एज्युकेशन फॉर नीडी या सेवाभावी शाखेच्या माध्यमातून शहरातील 166 गरीब गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींचे एकूण 19 लाख 75 हजार रुपये इतके शैक्षणिक शुल्क भरण्यात येणार असून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आदित्य मिल्क आणि आदित्य आईस्क्रीम कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम …
Read More »चोर्ला रस्ता तातडीने दुरुस्त करावा
बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे निवेदन बेळगाव (वार्ता) : गोव्याकडे जाणारा चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून वाताहत झालेल्या या रस्त्यामुळे बेळगावच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याबरोबरच वाहनचालकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे …
Read More »वेदांत सोसायटीला 9 लाख 60 हजारांचा निव्वळ नफा
बेळगाव : वडगाव-शहापूर रोड येथील वेदांत मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. आर्थिक वर्ष काळात संस्थेला 9 लाख 60 हजार 642 रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती, संस्थेचे चेअरमन संदीप खन्नुकर यांनी …
Read More »बेळगाव सीमाप्रश्नाबाबत साहित्य संमेलनात दिखाऊ ठराव करणे बंद करा : अॅड. असीम सरोदे
बेळगाव : ’बेळगाव महाराष्ट्रात आणा’ असा दिखाऊ ठराव करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील वार्षिक दिखाऊ कार्यक्रम बंद करावा आणि बेळगावातील मराठी माणसांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करावा. भाषिक विविधतेतील सुंदरता न जपता मराठी माणसांवर बेळगावात कर्नाटक राज्याच्या कन्नड धार्जिण्या सरकारकडून, पोलिसांकडून व राजकारण्यांकडून होणार्या संघटित हिंसाचाराचा …
Read More »ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण खबरदारी : मुख्यमंत्री बोम्माई
तुमकूर : परदेशात ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कर्नाटकात खबरदारीचे उपाय योजण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला मुख्यमंत्री बोम्माई यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. …
Read More »राज्यात लॉकडाऊन नाही! : आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
बेंगळुरू : नव्या कोरोना विषाणू व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्याची शक्यता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. सरकारने राज्यात लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आज सोमवारी स्पष्ट केले आहे. ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे कर्नाटकात लॉकडाऊन जारी करण्यात येणार असल्याची शक्यता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta