Sunday , May 10 2026
Breaking News

संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, इन्चार्ज शिक्षिका गीता वर्पे, आशा कुलकर्णी, विणाश्री तुक्कार, सुजाता पाटील यांच्या हस्ते भारतमाता, सरस्वती, ओमकार फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील व मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर योग शिक्षिका अनुराधा पूरी यांनी शिक्षकांकडून
योगाची प्रात्यक्षिके करून घेतली.
तसेच शाळेचा प्रारंभोत्सवही पार पडला. शाळेचे जनकल्याण ट्रस्ट सदस्य कृष्णा भट, श्रीकांत कदम, आनंद कालिंगण्णावर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांच्या हस्ते गणेशपूजन, सरस्वती पूजन व संत मीराबाईच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी आरती व मंत्र म्हटला.

About Belgaum Varta

Check Also

भरधाव दुचाकीची केएसआरटीसी बसला जोराची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Spread the love  रामदुर्ग तालुक्यातील घटना रामदुर्ग : तालुक्यातील हलगट्टी गावाजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *