Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरात पुन्हा पावसाचे आगमन…..

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरत आज सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावलेली दिसली. दिवसभरातील कमालीच्या उकाड्याने हैराण झालेल्या संकेश्वरकरांना सायंकाळच्या पावसाने मस्तपैकी गारवा मिळवून दिलेला दिसला. संकेश्वरकरांना यंदा अजब ऋतू पहावयास आणि अनुभवयास मिळाला आहे. बारा महिन्यातील पावसाळ्याचे चार नव्हे तर आठ महिने संकेश्वरकरांच्या वाटेला आले आहेत. संकेश्वरात हिंवाळा आणि आता उन्हाळा देखील पावसाचाच वाटू लागला आहे. यापूर्वी संकेश्वरातील नागरिकांना होळीनंतर पावसाच्या सरी पहावयास मिळायच्या. यंदा मात्र होळीपूर्वीच पावसाचे आगमन झालेले दिसत आहे. आठवडाभरात उन्हाचा तडाखा वाढल्याने लोक गरमीने परेशान झाले होते. आज पावसाच्या सरी अंगावर झेलत कांही नागरिक उष्मा घालवितानाचे चित्र पहावयास मिळाले. संकेश्वरातील जाणकार लोक सांगताहेत संकेश्वरात प्रथमच ऋतूचक्र बदलले आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला करणाऱ्यावर कारवाई करा : बोरगाव येथे निषेध मोर्चा काढून निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *