Friday , August 21 2026
Breaking News

दड्डी भागातील बेंदूर सण उत्साहात साजरा; बैलांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त

Spread the love

 

दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी परिसरात पारंपरिक बेंदूर सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कोट गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची विधिवत पूजा करून कृषी संस्कृतीचे जतन केले.

यावेळी शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगीबेरंगी झुली, माळा, फुलांचे हार व आकर्षक सजावटीने सजवले. बैलांच्या शिंगांना रंग लावून त्यांची विधीपूर्वक पूजा करण्यात आली. औक्षण करून नैवेद्य अर्पण करण्यात आला. शेतकरी कुटुंबांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली.

बेंदूर हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून शेतीच्या कामात वर्षभर साथ देणाऱ्या बैलांबद्दल आदर व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. या निमित्ताने गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

दड्डी भागातील गावात पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी कृषी संस्कृतीचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. सणानिमित्त गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी एकमेकांना बेंदूरच्या शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *