Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

पायावर गोळी झाडून पोलिसांनी केले आरोपीला अटक!

  बेळगाव : शनिवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर शहराच्या बाहेरील भागात पोलिसांनी दरोडा, सामूहिक बलात्कार आणि बेकायदेशीर शस्त्रे यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीला पायावर गोळी झाडून अटक केली. आज सकाळी ६ वाजता आरोपी रमेश किल्लार याला अटक करण्यासाठी पोलिस कर्मचारी गेले असता पोलीस हवालदार शरीफ दफेदारवर चाकूने मारहाण करून …

Read More »

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतले जिजाऊ गणेश मंडळाच्या बाप्पाचे दर्शन….

खानापूर : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आपल्या पत्नीसोबत खानापूर येथे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्थापन केलेल्या जिजाऊ गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जिजाऊ गणेश मंडळाच्या वतीने एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. अंजली निंबाळकर यांचे बंधू …

Read More »

30 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी पूर्णवेळ शाळा!

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे गेल्या 19 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता सुट्टी देण्यात आलेले शैक्षणिक दिवस भरून काढण्यासाठी उद्या शनिवार दि. 30 ऑगस्ट पासून दि. 20 सप्टेंबर 2025 पर्यंत दर शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत पूर्णवेळ शाळा भरविल्या जाणार आहेत. …

Read More »

अभिनेता दर्शनच्या पत्नी-मुलाविरुद्ध अश्लील पोस्ट; महिला आयोगाची कारवाईची मागणी

  बंगळूर : चॅलेंजिंग स्टार आणि अभिनेता दर्शनची पत्नी विजयालक्ष्मी आणि मुलगा विनेश यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महिला आयोगाने पोलिसांना पत्र लिहिले आहे. महिला आयोगाने पोलिस आयुक्तांना आयोगाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नेलमंगला येथील भास्कर प्रसाद यांनी महिला आयोगाकडे …

Read More »

धर्मस्थळ प्रकरण: खोटे बोलण्यासाठी सूत्रधाराने दिली सूपारी

  चिन्नय्याच्या जबाबाने खळबळ; तिमारोडी पुन्हा अडचणीत? बंगळूर : धर्मस्थळ प्रकरणाला रोज एक वेगळे वळण मिळत आहे. एकीकडे, सुजाता भटची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे एसआयटीच्या ताब्यात असलेल्या जागल्या (चिन्नय्या) ने आपणास खोटे बोलण्यासाठी पैसे देण्यात आल्याची माहिती दिल्याचे समजते. दरम्यान, जागल्याने आनलेली कवटी महेश शेट्टी तिमारोडी यांच्या बागेतून आणल्याची माहिती …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा : खेळांमुळे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक, सामाजिक विकासास मदत – अभिनव जैन

  बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिन देशाचे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. खेळांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. खेळांमुळे आपला फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक व सामाजिक विकास होण्यास मदत मिळते असे विचार व्यक्त करून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज आयोजित आंतर शालेय हॉकी स्पर्धेला शुभेच्छा …

Read More »

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

  बेळगाव : शहरातील कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीच्या मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. सज्जाद सुभेदार असे मृत तरुणाचे आहे. तो शाहुनगर येथील रहिवासी असून बेंगळुरूमधील एका खाजगी कंपनीत काम होता. काल रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या …

Read More »

बॅ. नाथ पै चौक मंडळाच्या वतीने वृद्धांना ब्लॅंकेट तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान

  बेळगाव : बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एक भव्य परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगाव सीमाभागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्सासात आणि उत्साहात साजरा केला जातो. बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी …

Read More »

माध्यमिक हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श शाळेला विजेतेपद

  बेळगाव ; अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर गोमटेश विद्यापीठ मजगांव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले वरील दोन्ही संघ आगामी होणाऱ्या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा …

Read More »

विसर्जनावेळी नटबोल्ट काढण्यासाठी आता मशीन

  गणेशोत्सव मंडळांचा त्रास होणार कमी : प्रशासनाचा निर्णय बेळगाव : कपिलेश्वर विसर्जन तलाव व रामतीर्थ तलाव येथे गणेशमूर्ती तयार करताना बसविलेले नट बोल्ट खोलण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विसर्जन तलावांवर सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी आल्यानंतर …

Read More »