Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे 26 ऑगस्ट 2025 रोजी “समाजभूषण” लोकशाहीर बहिर्जी शिरोळकर यांचा 36 वा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. शाळा सुधारणा होते. कमिटीचे उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर बहिर्जी शिरोळकर यांचे नातू श्री. दिनेश शिवाजीराव शिरोळकर, …

Read More »

भक्तीभावात, जल्लोषात गणरायाचे आगमन!

  बेळगाव : काही दिवसांपासून आपल्या गणरायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेश भक्तांची प्रतीक्षा अखेर आज संपली. आज पहाटेपासूनच बेळगाव शहर तसेच उपनगरात घरोघरी गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाचे स्वागत करण्यात आले. …

Read More »

रॅपिड ॲक्शन फोर्सचे बेळगावात पथसंचलन

  बेळगाव : श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे शहरातील विविध मार्गांवर लक्षवेधी पथसंचलन झाले. या पथसंचलनाला शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून प्रारंभ झाला . तेथून चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, शास्त्री चौक, दरबार गल्ली, खडेबाजार, …

Read More »

नादब्रह्मा भजन सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात

    बेळगाव : तारांगण, प्रवीण हॉलिडे आणि सुनील भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावच्या भजनी मंडळ यांना एक व्यासपीठ म्हणून नादब्रह्म भजन सोहळ्याचे आयोजन केले गेले हा कार्यक्रम नुकताच मिलेनीयम गार्डन येथे पार पडला. कन्सल्टिंग इंजिनियर सुनील भोसले व सामाजिक कार्यकर्त्या रेणू भोसले, प्रवीण बेळगावकर, प्रकाश कालकुंद्रीकर तारांगणच्या संयोजका अरुणा …

Read More »

धर्मस्थळ प्रकरण : तिमारोडी यांच्या निवासस्थानावर एसआयटीचा छापा; बुरुडे चिन्नय्याला आश्रय दिल्याचा आरोप

  बंगळूर : आज सकाळी, एसआयटीने उजिरे येथील महेश शेट्टी तिमारोडी यांच्या निवासस्थानी छापा टाकला, त्यांनी बुरुडे चिन्नय्या यांना आश्रय दिला होता, ज्यांनी धर्मस्थळाभोवती शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा केला होता. बेलतंगडी न्यायाधीशांकडून शोध वॉरंट मिळवल्यानंतर एसआयटी पथकाने आरोपी बुरुडे चिन्नय्या यांना सोबत घेऊन महेश शेट्टी आणि जवळच असलेल्या त्याचा भाऊ …

Read More »

संघाचे गीत गाईल्याने कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागतो : डी. के. शिवकुमार

    काँग्रेसशी माझे नाते भक्त आणि देवासारखे बंगळूर : उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी विधानसभेच्या कामकाजादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गीताच्या ओळींचा उल्लेख केला होता. यामुळे बराच गोंधळ उडाला आणि काँग्रेस नेत्यांनी स्वतः डी. के. शिवकुमार यांच्या शब्दांवर आक्षेप घेतला. बी. के. हरिप्रसाद यांनी, केपीसीसी अध्यक्ष म्हणून …

Read More »

वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलन; 31 जणांचा बळी

  जम्मू : जम्मूतील कटरा येथील वैष्णोदेवी धाम येथील अर्धकुमारी मंदिराजवळ काल (26 ऑगस्ट) मंगळवारी झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता वैष्णोदेवीच्या जुन्या मार्गावरील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ही दुर्घटना घडली. काल रात्री उशिरापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, परंतु सकाळी हा आकडा वाढला. प्रशासनाचे …

Read More »

संत मीरा, जी जी चिटणीस, बालिका आदर्श अंतिम फेरीत

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर गोमटेश विद्यापीठ मजगांव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, जी जी चिटणीस, बालिका आदर्श शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात जी जी चिटणीस शाळेने गोमटेश …

Read More »

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अबनाळी गावच्या विद्यार्थ्यांचे यश; जिल्हा स्पर्धेसाठी दहा विद्यार्थ्यांची निवड

  खानापूर : ताराराणी हायस्कूल खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शाळेचे विद्यार्थी स्वप्नील गावकर, सानिका कोवाडकर, सानिका गावकर, मनुजा गावकर व संजना पाटील या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरवली आहे. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी मंथन …

Read More »

गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांची भेट

  बेळगाव : अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी जिल्हा प्रशासनाकडून अल्पोपहाराचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत सत्ताधारी नगरसेवकांनी महानगरपालिकेत गोंधळ घालून जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शविला. या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने तात्काळ जत्तीमठात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर …

Read More »