Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

  मुंबई : हिंदी-मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. येत्या २२ ऑगस्टला त्यांचा ९१ वा वाढदिवस साजरा होणार होता, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोतदार यांच्या कन्या अनुराधा पारसकर यांनी दिली. त्यांंच्या पार्थिवावर …

Read More »

नवीलुतीर्थ, राजलखमगौडा जलाशय पूर्ण क्षमतेने भरली; पाण्याचा विसर्ग

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे मलप्रभा आणि घटप्रभा नद्या दुथडी भरून वहात आहेत आणि दोन्ही जलाशयांमधून पाणी सोडले जात आहे कारण जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सौंदत्ती तालुक्यातील मुनळ्ळळी येथील नवीलुतीर्थ जलाशयात येणारा प्रवाह वाढत आहे. २०७९.५० फूट क्षमता असलेल्या नवीलुतीर्थ जलाशयात सध्या २०७७.५० फूट पाणी आहे. …

Read More »

सार्वजनिक वाचनालय आयोजित भजन स्पर्धेचा आज समारोप; प्रा. पी. डी. पाटील यांची उपस्थिती

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या संगीत भजन स्पर्धेचा समारोप मंगळवार दि. 19 ऑगस्ट रोजी होत आहे. बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका व चंदगड तालुक्यातील एकंदर 31 भजनी मंडळांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत सोमवारी सायंकाळपर्यंत पंचवीस संघानी आपली कला सादर केली. मंगळवारी …

Read More »

अवधूत गुप्ते यांची संगीत भजन स्पर्धेस सदिच्छा भेट

  बेळगाव : “१७८ वर्षाची परंपरा असलेल्या या वाचनालयाच्या वतीने अशा प्रकारची संगीत भजन स्पर्धा आयोजित करून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेतील भजन ऐकून मला खूप आनंद झाला” असे विचार प्रख्यात गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते अवधूत गुप्ते यांनी बोलताना व्यक्त केले. श्री. अवधूत गुप्ते हे बेळगावला आले …

Read More »

मोफत बस ‘शक्ती’ योजनेची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

  बंगळूर : राज्य सरकारच्या शक्ती योजनेमुळे महिलांना राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. या हमी योजनेने एका प्रतिष्ठित जागतिक विक्रमात प्रवेश केला आहे. राज्य सरकारच्या पाच हमींपैकी एक असलेल्या शक्ती योजनेची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात आली आहे. ११ जून २०२३ ते …

Read More »

सिध्दरामय्या यांच्यावर खून केल्याचा तिम्मरोडीचा आरोप

  सरकारचा अटकचा आदेश; धर्मस्थळ प्रकरणाला मोठा ट्विस्ट बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २८ खून केले या महेश शेट्टी तिम्मरोडी यांच्या विधानाला गांभीर्याने घेत, सरकार एकाच दिवसात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सरसावले आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सभागृहात महेश शेट्टी तिम्मरोडी यांच्याविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आणि त्यांना अटक …

Read More »

शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस

  बेळगाव : मिलेनियम गार्डन येथे यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशन्स यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचा आज, मंगळवार दि. 19 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनात बेळगावकरांनी खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला. या प्रदर्शनात फर्निचर, टूर्स आणि ट्रॅव्हल्स, घरगुती उपयोगी साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक गाड्या, ज्वेलरी, …

Read More »

उद्याही शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर

  बेळगाव : सोमवारी शाळा कॉलेजना देण्यात आलेली सुट्टी मंगळवार 19 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, रामदुर्ग सौंदत्ती, चिकोडी आणि हुक्केरी तालुक्यातील सर्व सरकारी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अंगणवाड्यां आणि बेळगाव बैलहोंगल कित्तूर खानापूर रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्यातील पदवी पूर्व कॉलेजना मंगळवार …

Read More »

कार- दुचाकी अपघातात बेळवट्टी येथील तरुणीचा मृत्यू

  बेळगाव : बिजगर्णी-बेळवट्टी रस्त्यावरील कावळेवाडी क्रॉसजवळ एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात बेळवट्टी येथील तरुणीचा मृत्यू झाला असून मुलीची आई आणि मामा जखमी झाले आहेत. सदर घटना रविवारी सायंकाळी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव १८ वर्षीय रोहिणी रामलिंग चौगुले असे आहे, ती बेळवट्टी येथील रहिवासी असून …

Read More »

बेळगाव महानगरपालिका चार स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध

  बेळगाव : महानगरपालिकेच्या चार स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध पार पडली. ही प्रक्रिया अशा प्रकारे पार पाडण्यात आली की कोणालाही असमाधान वाटले नाही आणि समान न्याय सुनिश्चित करण्यात आला. आ. अभय पाटील आणि माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडली. रेखा मोहन हुगार यांची कर आकारणी, …

Read More »