Saturday , March 15 2025
Breaking News

Belgaum Varta

बांधकाम विभाग कोरोना ड्युटीत, अनेक कामे प्रलंबित

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड मधील अनेक कर्मचाऱ्यांच्या कोरोना कामाकडे ड्यूट्या लावल्या आहेत. याचा परिणाम बांधकाम विभागाची अनेक कामे प्रलंबित आहेत.वेगवेगळ्या फंडातून तालुक्यातील अनेक गावात विविध कामे मंजूर झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. पण या कामांच्या पुर्ततेसाठी इतर कागदपत्रे पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी अनेक जन …

Read More »

कोविड सेंटर लोकार्पण सोहळा संपन्न

चंदगड (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी अंजुमन–ए–इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चंदगडच्यावतीने लोकनेते स्वर्गीय नामदार बाबासाहेब कुपेकर कोविड विलिगीकरण कक्ष लोकार्पण सोहळा कोरोना बाबतीतचे सर्व नियम पाळून संपन्न झाला. यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर, नगराध्यक्ष सौ. प्राची दयानंद काणेकर, शिवसेना जिल्हा संघटक संग्रामसिंह कुपेकर …

Read More »

जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८७ रुग्ण; मुलांत लक्षणे नाहीत : जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव : जिल्ह्यात २ दिवसांत ब्लॅक फंगसचे १७ नवे रुग्ण आढळून आले होते. आजवर त्यांची एकूण संख्या ८७ झाली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही मुलामध्ये अद्याप ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आलेली नाहीत असे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मंगळवारी स्पष्ट केले. बेळगावात मंगळवारी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले की, …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात तीन दिवस कडक लॉकडाऊन

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात संपूर्ण 3 दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या आणि बळी पाहता शुक्रवार 4 जून सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन आहे. सोमवार 6 जून सकाळी 6 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील. शुक्रवार 4 जून रोजी …

Read More »

सेंट्रल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची कोरोना वॉरियरला मदत

बेळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्वतःच्या जीव धोक्यात घालून समाजासाठी झटणारे कोरोना वॉरियर सुरेंद्र अनगोळकर यांना आर्थिक मदत देत सेंट्रल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला.गेल्या दोन महिन्याच्या काळात हेल्प फॉर नीडी या संघटनेच्या माध्यमातून सुरेंद्र यांनी शेकडो मृतदेहावर अंतिम संस्कार केलाय अनेक कुटुंबांना जेवण व रेशन किटच मदत केली आहे. …

Read More »

नगरसेवक बैलूरकरकडून पीपी किट्स वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे कोविड रूग्नाना सतत उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी विश्वहिंदू परिषद बजरंग दलचे संयोजक अमोल परवी, अनिकेच गावडे व त्याच्या सहकार्यानी कोविड काळात २४ तास कोविड रूग्णांना अत्यावश्यक सेवेसाठी रूणवाहिकामधून उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे, एखाद्या रूग्ण उपचार दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करणे …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवावा : बीबीएमपी मुख्य आयुक्त

बेंगळुरू : मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी राज्यातील लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालावर अवलंबून असेल, असे म्हंटले आहे. दरम्यान राज्यातील कोविड प्रकरणांची संख्या कमी झाल्याने ७ जून रोजी लॉकडाऊन अनलॉक करताना कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान बृह बेंगळूर महानगर पालिका (बीबीएमपी) टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडण्याच्या बाजूने आहे. …

Read More »

खानापूरात माजी मंत्री देशपांडेकडून मास्क, सॅनिटाइझर, व्हिटॅमिन गोळ्याचे वितरण

खानापूर : कर्नाटक राज्याचे माजी मंत्री श्री. आर. व्ही. देशपांडे व त्यांचे चिरंजीव श्री. प्रशांत देशपांडे यांची खानापूर तालुक्याला नुकताच भेट झाली.यावेळी तहसील कार्यालयाला भेट देऊन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्याकडे मास्क, सॅनिटाइझर व व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा साठा सुपूर्द केला व गरजु लोकांपर्यंत पोहचवण्याची सुचना केली,यावेळी बोलताना माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे …

Read More »

खानापूर – जांबोटी क्राॅसवर रस्ता झाला सुना सुना

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊन कडक करण्यात आला. मात्र जत- जांबोटी महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने खानापूर शहराच्या जांबोटी फाट्यावरील अनेक खोकी हटल्याने आता खानापूरचा जांबोटी क्राॅसवर सुना सुना वाटत आहे.सध्या कोरोनामुळे कोणच बाहेर पडत नाही. मात्र खोकी हटवण्याची सक्ती करण्यात आल्याने रविवारी सोमवारी दोन दिवस खोकीधारकानी आपली खोकी …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

  बेळगाव : १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि अन्य संघटनांच्या वतीने मंगळवारी अभिवादन करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात मंगळवारी सकाळी १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांच्या त्यागाचे समरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी कटिबद्ध व्हा असे …

Read More »