Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्त करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

बेळगाव : ३० वर्षांपूर्वी एका कंत्राटदाराच्या थकीत बिलाच्या प्रकरणासंदर्भात बेळगाव जिल्हा दंडाधिकाऱ्यांची कार जप्त करण्यात आली आहे. १९९२-९३ मध्ये चिक्कोडी येथील दुधगंगा नदीवर बंधारा बांधण्यासाठी नारायण कामत नावाच्या व्यक्तीने लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत कंत्राट घेतले होते. सशर्त करारानुसार निधी न दिल्याबद्दल कंत्राटदाराने १९९५ मध्ये विभागाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी करणाऱ्या …

Read More »

बेळगावमध्ये नव्या आरटीओ इमारतीचे उद्घाटन

  बेळगाव : बेळगावच्या आरटीओ चौकात उभारण्यात आलेल्या संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल विकास …

Read More »

निपाणी परिसरात युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला जोर निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा मांगूर, कून्नुर, कोगनोळी, दत्तवाडी, गजबरवडी, अडी, बेनाडी, बारवाड, काररदगा येथे युवा समिती निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी अध्यक्ष श्री. अजित …

Read More »

कोनेवाडीत भगवा फडकवल्याप्रकरणी उर्वरित चौघांनाही जामीन

  बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल -पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणाच्या खटल्यातील वॉरंट जारी केलेल्या 5 जणांपैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे यांना यापूर्वीच जामीन मंजूर …

Read More »

मारहाणीच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : साक्षीदारातील विसंगतीमुळे मारहाण करून हातोड्याने वार केल्याच्या आरोपातून चौथे जेएमएफसी न्यायालयाने कंग्राळी खुर्द येथील एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्याचे नाव सिद्धार्थ चंद्रकांत चौगुले (वय 25, रा. महादेव रोड, कंग्राळी खुर्द ता. जि. बेळगाव) असे आहे. प्रकरणाची माहिती अशी की, संशयित सिद्धार्थ चौगुले याने …

Read More »

राणी चन्नम्मा विद्यापीठाला प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’

  बेळगाव : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाला भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’ देऊन नुकताच आयआयटी मुंबई येथे गौरविण्यात आले आहे. पुरस्काराचा स्वीकार करून बोलताना राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यापीठ समाजाच्या शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना …

Read More »

मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी युवा समिती नेहमी अग्रेसर : युवा कार्यकर्ते अभिजीत सरदेसाई

  खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने खारीचा वाटा उचलला आहे. त्याचे येणाऱ्या काळात चांगले परिणाम दिसून येतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते अभिजीत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. युवा समितीच्यावतीने गुरुवारी खानापूर तालुक्यातील करंबळसाह विविध गावांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण …

Read More »

बेंगळुरूमधील ४० खाजगी शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

  बंगळूर : शहरातील शाळांना बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल येणे सुरूच आहे, केंगेरी आणि राजराजेश्वरी नगरसह शहरातील ५० हून अधिक खासगी शाळांना आज सकाळी समाजकंटकांकडून बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल आले. मात्र हे दमक्यांचे ईमेल खोटे असल्याचे तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितले. सकाळी ७.२४ वाजता roadkill333@atomicmail.io या वापरकर्त्याकडून ‘शाळेत बॉम्ब’ या विषयाचा एकच, समान …

Read More »

डीसीपी पदाचा पदभार एन. व्ही. बरमणी यांनी स्वीकारला!

  बेळगाव : बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्थेचे नवीन डीसीपी म्हणून एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. बेळगावला एक उत्तम आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी सेवा देण्याचे आश्वासन डीसीपी एन. व्ही. बरमणी यांनी दिले. बेळगाव कायदा व सुव्यवस्थेचे नवीन डीसीपी म्हणून एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. धारवाड जिल्ह्याचे …

Read More »

स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंची राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी

  बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटनेच्यावतीने नुकत्याच आयोजित केलेल्या एनआरजे राज्य उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2025 -26 मध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश मिळवताना 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत. कॉर्पोरेशन स्विमिंग पूल (बीएसी) बसवनगुडी, बेंगलोर येथे गेल्या 9 ते 13 जुलै 2025 …

Read More »