शिवजयंती उत्सवाच्या तयारीसाठी पोलीस आयुक्तांसोबत मध्यवर्ती मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बेळगाव (प्रतिनिधी) : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगावच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शहराचे पोलीस आयुक्त श्री. भुषण गुलाबराव बोरसे (IPS) यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन येऊ घातलेल्या श्री शिवजयंती उत्सवाच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी अध्यक्ष अंकुश केसकर यांनी पोलीस …
Read More »धारपवार समाजाच्या एकत्रीकरणसाठी निपाणीत रविवारी धारपवार मेळाव्याचे आयोजन
निपाणी (वार्ता) : सीमा भागातील धारपवार समाजाची एकत्रीकरण बैठक व परिचय मेळावा रविवारी (ता.१२) सकाळी १०.३० वाजता साखरवाडीतील महर्षी वाल्मिकी भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्य प्रवर्तक डॉ. भालचंद्र पोवार व गोविंदराव पवार यांनी दिली आहे. या कार्यक्रमात परिचय चर्चा मनोगत व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. …
Read More »सर्वोत्तम श्राविका पुरस्कार मिळाल्याने मीनाक्षी पाटील यांचा विविध संस्थातर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संस्थेच्या संचालिका मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती मीनाक्षीआई रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न …
Read More »खर्गे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आसाममध्ये तक्रार; अटकेची मागणी
बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्याविरोधात कथित वादग्रस्त व भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात आसाममध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आसाममधील गुवाहाटी येथे राष्ट्रीय …
Read More »बारावी परीक्षेचा आज निकाल
बंगळूर : कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ (केएसईएबी) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा-१ चा निकाल उद्या, ९ एप्रिल २०२६ रोजी जाहीर होणार आहे. मंडळाच्या पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा निकाल प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदाच्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान …
Read More »देशसेवेतून २२ वर्षानंतर निवृत्त झाल्याने नायक यमाजी पुजारी यांचा नागरी सत्कार
निपाणी (वार्ता) : म्हसोबा हिटणी येथील सुपुत्र नायक यमाजी बिवा पुजारी (ईएमई दल) हे भारतीय सैन्यात २२ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचे ग्रामस्थातर्फे स्वागत करुण नागरी सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कुटुंबीयांसह निपाणी नगरपालिकेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला …
Read More »घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई करणाऱ्यावर कारवाई करा
अन्यथा श्रीराम सेनेतर्फे तीव्र आंदोलन; निपाणी उपतहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही गॅस वितरक आणि पुरवठा कर्मचारी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक लूट होत असून प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी …
Read More »खानापूरमधील ऐतिहासिक हलशी गावात महालक्ष्मी यात्रा उत्साहात
खानापूर : खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध हलशी गावात महालक्ष्मी यात्रा महोत्सवाचा मोठ्या थाटात प्रारंभ झाला आहे. कदंब वंशाच्या काळातील ही उपराजधानी असलेल्या गावात आज पहाटे देवीचा ‘होन्नाटा’ विधी पार पडला असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्यातील कदंबकालीन ऐतिहासिक उपराजधानी असलेल्या हलशी गावात महालक्ष्मी …
Read More »हॉटेल चालकांना व्यावसायिक सिलेंडर वेळेत द्या
हॉटेल व्यवसायिकांची मागणी; गॅस वितरकांना दिले निवेदन निपाणी (वार्ता) : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे १५ दिवसापासून हॉटेल पालकांना व्यवसायिक सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून अनेकांनी हॉटेल बंद केले आहेत. त्याचा अनेक कुटुंबीयांवर परिणाम होत असून हॉटेल व्यवसायिकांना वेळेवर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या …
Read More »‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक खटल्यातील सर्वांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक वादातून बारा वर्षांपूर्वी येळ्ळूर येथे निष्पाप ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेल्या सर्व सात खटल्यांमधील सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. २७ जुलै २०१४ रोजी “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” असा फलक हटवल्यानंतर पोलीस प्रशासनाने एकूण ७ खटले दाखल केले होते. यापूर्वीच्या ५ खटल्यातून सर्व निर्दोष सुटले होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta