निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला जोर निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा मांगूर, कून्नुर, कोगनोळी, दत्तवाडी, गजबरवडी, अडी, बेनाडी, बारवाड, काररदगा येथे युवा समिती निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी अध्यक्ष श्री. अजित …
Read More »कोनेवाडीत भगवा फडकवल्याप्रकरणी उर्वरित चौघांनाही जामीन
बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल -पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणाच्या खटल्यातील वॉरंट जारी केलेल्या 5 जणांपैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे यांना यापूर्वीच जामीन मंजूर …
Read More »मारहाणीच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता
बेळगाव : साक्षीदारातील विसंगतीमुळे मारहाण करून हातोड्याने वार केल्याच्या आरोपातून चौथे जेएमएफसी न्यायालयाने कंग्राळी खुर्द येथील एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्याचे नाव सिद्धार्थ चंद्रकांत चौगुले (वय 25, रा. महादेव रोड, कंग्राळी खुर्द ता. जि. बेळगाव) असे आहे. प्रकरणाची माहिती अशी की, संशयित सिद्धार्थ चौगुले याने …
Read More »राणी चन्नम्मा विद्यापीठाला प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’
बेळगाव : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाला भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’ देऊन नुकताच आयआयटी मुंबई येथे गौरविण्यात आले आहे. पुरस्काराचा स्वीकार करून बोलताना राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यापीठ समाजाच्या शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना …
Read More »मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी युवा समिती नेहमी अग्रेसर : युवा कार्यकर्ते अभिजीत सरदेसाई
खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने खारीचा वाटा उचलला आहे. त्याचे येणाऱ्या काळात चांगले परिणाम दिसून येतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते अभिजीत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. युवा समितीच्यावतीने गुरुवारी खानापूर तालुक्यातील करंबळसाह विविध गावांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण …
Read More »बेंगळुरूमधील ४० खाजगी शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
बंगळूर : शहरातील शाळांना बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल येणे सुरूच आहे, केंगेरी आणि राजराजेश्वरी नगरसह शहरातील ५० हून अधिक खासगी शाळांना आज सकाळी समाजकंटकांकडून बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल आले. मात्र हे दमक्यांचे ईमेल खोटे असल्याचे तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितले. सकाळी ७.२४ वाजता roadkill333@atomicmail.io या वापरकर्त्याकडून ‘शाळेत बॉम्ब’ या विषयाचा एकच, समान …
Read More »डीसीपी पदाचा पदभार एन. व्ही. बरमणी यांनी स्वीकारला!
बेळगाव : बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्थेचे नवीन डीसीपी म्हणून एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. बेळगावला एक उत्तम आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी सेवा देण्याचे आश्वासन डीसीपी एन. व्ही. बरमणी यांनी दिले. बेळगाव कायदा व सुव्यवस्थेचे नवीन डीसीपी म्हणून एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. धारवाड जिल्ह्याचे …
Read More »स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंची राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी
बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटनेच्यावतीने नुकत्याच आयोजित केलेल्या एनआरजे राज्य उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2025 -26 मध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश मिळवताना 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत. कॉर्पोरेशन स्विमिंग पूल (बीएसी) बसवनगुडी, बेंगलोर येथे गेल्या 9 ते 13 जुलै 2025 …
Read More »बदल स्विकारुन माध्यमांचे महत्व वृध्दिंगत करुया; कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील सूर
कोल्हापूर : माध्यमांमध्ये येत असलेले नवनवे बदल तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी पुढे येत असलेली विविध आव्हाने स्विकारणे काळाची गरज आहे. आपले अस्तित्व अधिक ठसठशीत करण्यासाठी नव्या बदलांचा अविष्कार सकारात्मपणे स्विकारणे गरजेचे असल्याचा सूर आज कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात झालेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागाच्या …
Read More »विधानभवनाच्या लॉबीतील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच जितेंद्र आव्हाड यांचे ठिय्या अन्…
मुंबई : विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळच वळण घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी काल (17 जुलै) रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तुफान राडा घालत चांगलाच गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta