बेळगाव : बेळगावच्या सर्वलोक फौंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ यांनी हायवे शेजारी पडलेल्या भग्न प्रतिमांचे संकलन करत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे. दोनच दिवसांपूर्वी रस्त्यावर अपघात मयत झालेल्या श्वानांचे विधिवत अंतिम संस्कार करून प्राणीदया दाखविलेल्या सर्वलोक फौंडेशनने रस्त्या शेजारी पडलेल्या देवीदेवतांच्या प्रतिमांचे संकलन करून सामाजिक बांधिलकी दाखवली आहे. रविवारी होनगा …
Read More »माणगांव नगरपंचायत इमारतीसाठी विशेष अनुदानाची मागणी
माणगांव (नरेश पाटील) : माणगांव नगरपंचायत ही नवनिर्वाचित नगरपंचायत आहे. माणगांव हे तालुक्याचे ठिकाण असून शहराची लोकसंख्या 25000 पेक्षा जास्त आहे. माणगांव नगरपंचायतीचे कामकाज पूर्वीच्या जुन्या इमारतीमध्ये चालत असून सदर इमारत ही 50 वर्षे जुनी आहे. दैनंदिन कामासाठी सध्याची इमारत अपुरी पडत आहे. नुकताच रायगड जिल्ह्यात चक्रीय वादळामुळे नगरपंचायतीच्या कार्यालयाचे …
Read More »संकेश्वरात उद्या स्त्रीत्वाचा उत्सव : सौ. सिमा हतनुरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे रविवारी दि. ६ मार्च २०२२ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीत्वाचा उत्सव ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी केले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगराध्यक्षा सौ. सिमाताई …
Read More »सार्वजनिक वाचनालयाची उद्याची बैठक बेकायदेशीर : प्रा. आनंद मेणसे
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांचा मानबिंदू म्हटल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमान संचालक मंडळ आणि यापूर्वीचे संचालक मंडळ यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. मात्र विद्यमान संचालक मंडळाच्यावतीने रविवार दि. ६ मार्च रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. सदर वार्षिक सभा ही बेकायदेशीर असल्याचा आरोप प्रा. आनंद मेणसे यांनी केला …
Read More »श्रींच्या हस्ते मठाच्या सेवकांचा सत्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते मठाचे सेवक बाबासाहेब जाधव, सुरेश आगम, सर्जेराव गायकवाड, विलास आगम, राजू शेंडेकर, पिंटू कारखाने, ओंम शिंदे, संदिप जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मठाचे व्यवस्थापक अर्जुन कानवडे, प्रकाश हुद्दार, गिरीश कुलकर्णी, गणपती पाटील, सुहास …
Read More »संकेश्वरात इगनायट जिमचे शानदार उद्घाटन
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुन्या पुणे-बेंगळूर मार्गावरील सदा कब्बूरी यांच्या एम.एस.बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावरील इगनायट पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थितांचे स्वागत जिमचे प्रशिक्षक गौतम उर्फ ओंकार पोवार यांनी केले. उद्घाटन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, सदा कब्बूरी, …
Read More »मराठा समाजाच्या स्वामींचा होणार बेळगावात सत्कार
बेळगाव : शहाजीराजांनी स्थापन केलेल्या मराठा समाजाच्या मठाचे स्वामी म्हणून मंजुनाथ स्वामी यांचा पट्टाभिषेक नुकताच झाला. कर्नाटक परिसरात पसरलेला मराठा समाज एकसंघ रहावा, यासाठी शहाजीराजांनी मराठा समाजाचे धार्मिक अधिष्ठान निर्माण केले. त्या धर्म गादीवर नवीन स्वामींची नियुक्ती झाल्यामुळे मराठा समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 5 मार्च …
Read More »विद्यार्थ्यांनी दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे : प्रा. सोहन तिवडे
‘गोमटेश’मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : दुसऱ्यांची नक्कल करण्यापेक्षा आपल्यातले सुप्तगुण कसे ओळखावेत आणि त्या गुणांचा विकास कसा करावा. परीक्षेच्या कालावधीत पालकांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या शिवाय अभ्यासामुळे घरातील वातावरण हे चांगले राहावे यासाठी कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी मनावर दडपण न ठेवता परीक्षेला सामोरे जावे. …
Read More »रिंग रोड हाणून पाडू : तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंग रोडच्या विरोधात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, बेळगाव तालुक्यामध्ये होणाऱ्या रिंग रोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मारक ठरणार आहे. यापूर्वीही रिंग रिंग रोड सरकारने नोटीफिकेशन …
Read More »पालखी प्रदक्षिणाने बाबा महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता
निपाणी (वार्ता) : येथील दर्गा संस्थापक संत बाबा महाराज चव्हाण पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. गेले आठ दिवस ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले. शनिवारी शेवटच्या दिवशी दिंडी प्रदक्षिणा चव्हाणवाडा ते दत्त मंदिर, हरी मंदिर, थळोबा पेठ, विद्या मंदिर मैदान समाधी स्थळ तसेच दर्गा भेट व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta