निपाणीत हॉटेलवर कारवाई : पाच महिलांची सुटका निपाणी : येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर शनिवारी(ता.२६) रात्री उशिरा शहर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून आठ जणांवर कारवाई केली. यामध्ये एका परदेशी महिलेचा समावेश आहे. मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय …
Read More »हिंडलगा येथे जागतिक मराठी भाषा दिन साजरा
बेळगाव : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे दि. 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन हा जागतिक मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे व मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यायाम शाळेच्या सभागृहात संपन्न …
Read More »रविवारी खानापूरात पोलिओ डोसचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी): तब्बल दोन वर्षानंतर आरोग्य खात्याच्यावतीने खानापूर सरकारी दवाखान्यात ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचा शुभारंभ रविवार दि. २७ रोजी देण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजीव नांद्रे, डॉ. तसमीन भानू, डॉ. प्रगती विनायक, डॉ. प्रेमा तोंडी, त्याचबरोबर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने, प्रेमानंद नाईक, एस. आर. पाटील, …
Read More »बेळगावातील भुईकोट किल्ल्यावर ऐतिहासिक दुर्ग पूजा गडकिल्ले संवर्धन
बेळगाव : दुर्गसंवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था आणि किल्ले संवर्धन समिती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक दुर्ग पूजा सोहळा बेळगाव येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी उत्साहात पार पडला. शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपुजेचे हे बाविसावे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतीतील इतर नऊ राज्यातील १३१ हून अधिक गड-किल्ल्यांवर तसेच परदेशातील …
Read More »एनयुजेएम बेळगाव शाखेच्यावतीने मराठी भाषा दिन साजरा
बेळगाव : बेळगावमधील नामवंत कवियित्रींनी विविधांगी स्वरचित कविता सादर करून मराठी भाषा दिनी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. कुसुमाग्रज तथा विनायक वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकारांच्या सन्मानासाठी व सक्षम पत्रकारितेसाठी कार्य करणाऱ्या नॅशनल युनियन जर्नालिस्ट महाराष्ट्र (एनयुजेएम) …
Read More »निडसोसी महाशिवरात्र महोत्सवात मंत्री उमेश कत्तींंचा सहभाग
संकेश्वर (प्रतिनिधी) : राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी आज निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाला धावती भेट देऊन देवदर्शनाबरोबर श्रींचा आशीर्वाद घेतला. निडसोसी मठात महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मंत्रीमहोदयांनी आपला सहभाग दर्शविला. यावेळी निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी मंत्री उमेश कत्तीं यांना महाशिवरात्र …
Read More »तेऊरवाडीच्या स्वाती पाटील हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड (ता. चंदगड) येथील बी.ए भाग दोनची स्वाती लक्ष्मण पाटील हिची ठाणे येथे होणार्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. ही निवड 17 फेब्रुवारी 2022 रोजी सांगाव कागल येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा अजिंक्य पद स्पर्धेतून झाली आहे. …
Read More »युवा समितीच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांअंतर्गत लक्ष्मीनगर, मच्छे येथील पूर्ण मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या इयतेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सागर कणबरकर म्हणाले की, गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मराठी शाळांमध्ये पहिल्या इयत्तामध्ये दाखल होणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर …
Read More »पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयमध्ये वार्षिक क्रीडा संपन्न
बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये वार्षिक क्रीडा संपन्न झाल्या. वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन धर्मस्थळ फंडच्या फील्ड सुपरवायझर सुजाता मॅडम व सेवा प्रतिनिधी अश्विनी मॅडम यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चांगळेश्वरी हायस्कूलचे माजी शारीरिक शिक्षक मधु पाटील हे उपस्थित होते. मधु पाटील यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक व …
Read More »ज्ञानोबा, तुकोबांच्या मराठी भाषा समृद्धीवर मोहोर उमटवा!
प्रा. राजन चिकोडे यांचे पत्रक : मराठी भाषिकांची एकजुटीने लढावे निपाणी (वार्ता) : सुमारे अडीच हजार वर्ष प्राचीन व समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सीमा भागातील व इतर राज्यातील मराठी भाषिक संस्था व व्यक्तीनीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ज्ञानोबा, तुकोबांच्या मराठीची पताका दिल्ली तख्तावर फडकविणेसाठी राजकीय मतभेद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta