बेळगाव : आमदारकीची निवडणूक जशी जवळ येईल तसं बेळगावचे राजकीय वातावरण तापत चालले आहे. हौसे, नवसे, गवसे सगळे झटून कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांबरोबरच समितीत सुद्धा वादळ घोंगावू लागले आहे. काही जणांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत. तर काहींना आमदार झाल्यासारखे वाटते, काही जण घोड्यावर बसले आहेत तर काही जण गुडघ्याला …
Read More »वीज कोसळून खानापूर तालुक्यातील बेटगिरी येथील महिला ठार…
खानापूर : बेटगिरी येथील सौ. मनिषा दत्तू गुरव (वय 42) यांचा अंगावर वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला. आज शनिवारी वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. यावेळी मनिषा काजू वेचत होत्या. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना गंभीर अवस्थेत बेळगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले; परंतू तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. या …
Read More »संतोष आत्महत्या प्रकरण; सात पथके कर्नाटकाच्या विविध भागात
एडीजीपी प्रताप रेड्डी; पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न बंगळूर : अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) (कायदा व सुव्यवस्था) प्रताप रेड्डी शनिवारी उडुपी येथे आले. त्यांनी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कथित आत्महत्या प्रकरणी तीन तास बैठक घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. बैठकीत तपास पथकांचा भाग असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सकाळी …
Read More »हरेकृष्ण रथयात्रा उद्या सकाळी 10 वाजता
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रा यंदा रविवार दि.17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. रोज होत असलेल्या पावसाचा विचार करून रथयात्रेच्या वेळेत बदल करण्यात आला असून रविवारी सकाळी 10 वाजता नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. तेथून खडेबाजार …
Read More »संभाजी नगर वडगाव येथे श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील श्री गणेश व मारूती मंदिर सांस्कृतिक ट्रस्ट, धर्मवीर संभाजी युवक मंडळ आणि महिला मंडळाच्यावतीने श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 6.30 वा. जन्मोत्सव व पूजाअर्चा करण्यात आली. राजेंद्र कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर सामूहिक हनुमान चालिसा पठन करुन प्रसाद वाटप करण्यात …
Read More »गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेवर झाड कोसळून इमारतीचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : शनिवारी दि. १६ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने शाळेच्या प्रार्थना हाॅलचे संपूर्ण छप्पर मोडून जमिनदोस्त झाले. सुदैवाने शाळाना उन्हाळी सुट्टी असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र कौलारू इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळावरून मिळालेली …
Read More »तरुणाने केला देहदानाचा संकल्प!
देहदानाच्या संकल्पामुळे समाजासमोर निर्माण केला आदर्श! बेळगाव : शारीरिक व्यंग असूनही काहीतरी विशेष करून दाखवणाऱ्या माणसांची उदाहरणे आपल्या आजूबाजूला अनेक आढळतात. कुणी गीत गायनात वेगळेपण दाखवतं तर कुणी वादन कलेत निपुण असतं. कुणी जागतिक जलतरण पटू म्हणून कीर्ती मिळवत तर कुणी पायांनी चित्र काढण्यात पारंगत असतं. अपंगत्वावर मात करत अलौकिक …
Read More »शेतकरी नेत्यांचे आमदार अभय पाटील यांच्या घरासमोर आंदोलन
बेळगाव : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यात यावेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या आग्रहासाठी शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव होसूर येथील दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या घरासमोर शेतमालाची विक्री करत आंदोलन छेडण्यात आले. ११ ते १७ एप्रिल हा शेतकऱ्यांच्या विश्वासघाताचा सप्ताह म्हणून ठरविण्यात आला असून याअंतर्गत राज्यभरात संयुक्त आंदोलन कर्नाटक …
Read More »संकेश्वरात इच्छापूर्ती श्री मारुती मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी. बी. रोड, यशागोळ काॅलनीतील इच्छापूर्ती श्री मारुती मंदिर वास्तूशांती व उद्घाटन सोहळा पवनपुत्राच्या जयंतीला भक्तीमय वातावरणात पार पाडण्यात आला. संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, चंद्रशेखर यशागोळ यांचे हस्ते नूतन श्री मारुती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पुरोहित …
Read More »संकेश्वरात श्री हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील सर्वच श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांंनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. येथील श्री विठ्ठल मंदिरात पवनपूत्राच्या प्रतिमा पूजनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विनायक भागवत यांनी श्री मारुती प्रतिमेचै पूजन केले. भक्तगणांना प्रसाद स्वरुपात सुंठवडा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta