Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

आजरा पोलीसांची तत्परता, कोटीच्या गुन्ह्यातील हरीयाणाच्या दरोडेखोरांना केले अटक

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापरचे पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाब राज्यातील डेराबसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जागा खरेदी विक्री व्यवसायाच्या ऑफिसवर दरोडा टाकुन व तेथील एका इसमावर गोळ्या घालून गंभीर जखमी करुन एक कोटी रुपये रक्कम लुटुन नेले. त्यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करत चौघांना पोलिसांनी …

Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने चंदगडच्या पत्रकाराना रेनकोटांचे वाटप

चंदगड (एस. के. पाटील) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंदगड पत्रकारांना तालुक्यातील मनसेचे कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या पुढाकाराने छत्र्यांचे व रेनकोटांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील यांनी पत्रकार हा वेळी अवेळी वृतसंकलनासाठी …

Read More »

मल्लिकार्जुन सौहार्दतर्फे मुडशी-मुरगाली यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री मल्लिकार्जुन अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे नूतन नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी, बढती मिळविलेले अधिकारी रविंद्र मुरगाली यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉ. टी.एस. नेसरी, एम. जी. होसूर, प्रकाश कणगली, मल्लीकार्जुन सौहार्दाचे अध्यक्ष मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना …

Read More »

काश्‍मीरमध्‍ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा

जम्मू : जम्‍मू-काश्‍मीरमधील कुपवाडा आणि कुलगाम येथे आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्‍ये चकमक झाली. यामध्‍ये कुपवाडामध्‍ये झालेल्‍या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्‍यात सुरक्षा दलाच्‍या जवानांना यश आले. कुपवाडा पोलिस आणि २८ आरआर दलाचे जवानांनी संयुक्‍तपणे ही कारवाई केली. कुपवाडामधील लोलाब परिसरात दहशतवाद्यांचा आश्रय घेतला असल्‍याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. कुपवाडा …

Read More »

बेळगाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत तपासणी

कोगनोळी : अग्निपथ योजनेला बेळगाव येथे सोमवार तारीख 20 रोजी बंद पुकारून मोर्चा काढण्यात येणार होता. सदर बंदला व मोर्चाला जिल्हाधिकारी व पोलिस अधिकारी यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याकारणाने बेळगावमध्ये होणारा बंद व मोर्चा मागे घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या टोल …

Read More »

एकही शिवसैनिक गद्दार नाही, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची चिंता नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : सोमवारी अर्थात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी उद्याच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतल्या वेस्टइन हॉटेलमध्ये पाचारण केलं आहे. या सर्व आमदारांशी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

‘अग्‍निपथ’साठी होणार्‍या भरतीच्‍या तारखा जाहीर; गुन्‍हा दाखल झालेल्‍यांना मिळणार नाही संधी

नवी दिल्ली : देशातील विविध राज्‍यांमध्‍ये अग्‍निपथ भरती योजनेला तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर लष्‍कराच्‍या तिन्‍ही दलाच्‍या प्रुमखांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. तसेच हवाई दलाची भरती प्रक्रिया २४ जून, नौदलाची २५ जून तर भुदलाची १ जुलैपासून सुरु होईल, अशी घोषणा यावेळी करण्‍यात आली. तसेच हिंसाचार …

Read More »

कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही : पोलीस आयुक्त बोरलिंगय्या

बेळगाव : अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ बेळगावात उद्या पुकारण्यात येणाऱ्या बंदला कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. परवानगी नसताना निदर्शने आणि आंदोलने केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात सातत्याने आंदोलनाचा छेडली जात आहेत. बेळगाव …

Read More »

भारत नगर येथील कर्जबाजारी विणकराची आत्महत्या

बेळगाव : कर्जबाजारी झाल्याने भारत नगर येथील एका विणकराने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. कल्लाप्पा रुद्रप्पा सोनटक्की उर्फ ​​कुकडोळी (५८, रा. भारत नगर, हमालवाडी, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. स्वतःचे घर आणि विद्युत यंत्रमाग विकून कर्जबाजारी झाल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी खासगी बँकेकडून सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज …

Read More »

जनता राष्ट्रीय पक्षांना वैतागली

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील काँग्रेस, भाजप, धजद या तिन्ही ही राष्ट्रीय पक्षाना वैतागली आहे. केवळ निवडणूक पैशाचा वापर करून निवडणूकी निवडून यायचे. मात्र जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष करायचे. अशाना आता घरचा रस्ता दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेतला आहे. तेव्हा खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीपासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुकीसाठी …

Read More »