नवी दिल्ली : किमान लोकांनी देवालाही तरी फसवू नये असं म्हणतात. मात्र, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला याच्या उलट अनुभव आला आहे. ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाउन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल …
Read More »विधानपरिषद निवडणूक; मतदानाच्या परवानगीसाठी देशमुख आणि मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. त्यांच्यासोबतच १०० कोटींच्या गैरव्यवहारात नाव आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील मतदानासाठी कोर्टाचे उंबरठे झिजवत आहेत. राज्यसभेला मतदान …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कामगिरी, 24 तासांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू : जम्मू आणि काश्मिरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत रविवारी रात्री उशिरापर्यंत इन्काउंटरमध्ये आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. सुरक्षा दलाकडून सध्या परिसरात शोधकार्य सुरु आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. रविवारी कुपवाडामध्ये जवानांनी दोन …
Read More »युवा सेनेच्यावतीने शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन साजरा
बेळगाव : शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त युवा सेना सीमाभाग बेळगांवची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी युवासैनिक व कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. नाथ पै चौक, शहापूर येथील नेताजी भवन येथे शिवसेना युवा सेना बेळगावची बैठक काल रविवारी पार पडली. सदर बैठकीस …
Read More »27 जूनच्या महामोर्चासंदर्भात खानापूर तालुका समितीची मौजे नागूर्डा येथे जागृती बैठक
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नागूर्डा येथे 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली, यावेळी गावातील विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्ष श्री. निरंजन सरदेसाई होते, बैठकीचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड …
Read More »बंगळुरुमध्ये पावसाचा विजय, मालिका बरोबरीत
बंगळुरू : पावसामुळे निर्णायक सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली आहे. बंगळुरु येथे सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. सामन्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे नाणेफेक झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय …
Read More »विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये खरी लढत, कोण मारणार बाजी?
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास …
Read More »अग्निपथ विरोधात खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे उपोषण
खानापूर : अग्निपथ विरोधात खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आज रविवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत शिवस्मारक चौक खानापूर येथे लाक्षणिक उपोषण केले. केंद्र सरकारच्या अग्निपथ धोरणाच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला रयत संघटनेचे श्री. बसनगौडा पाटील व त्यांच्या साथीदारांनी आपला पाठींबा दर्शविला. तसेच कन्नड …
Read More »उचगावात 27 जूनच्या मोर्चाची जनजागृती!
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत यासाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली 27 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची जनजागृती उचगाव येथील मध्यवर्ती गणेश मंदिरात करण्यात आली. यावेळी या मोर्चाला गावातील नागरिकांनी बहुसंख्येने हजर राहावे व मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी केले. मराठी भाषिकांनी आपल्या …
Read More »27 जुनचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी खानापूर समितीकडून मोदेकोपमध्ये जनजागृती
खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत यासाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली 27 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची पत्रके वाटून मोदेकोप या गावी जनजागृती करण्यात आली. यावेळी या मोर्चाला गावातील नागरिकांनी बहुसंख्येने हजर राहावे व मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले तसेच मराठी भाषिकांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta