Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

एमएसस्सीत पल्लवी शेडबाळ चन्नम्मा विद्यापीठात तिसरी

बेळगाव : मराठा मंडळ संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयातील एमएससी आणि एमकॉम पीजी सेंटरची विद्यार्थिनी पल्लवी तिपन्ना शेडबाळ हिने राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथे एमएससीमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. बेळगावच्या इतिहासात या पद्धतीने चन्नम्मा विद्यापिठात एखाद्या विद्यार्थी विद्यार्थिनीने रँक मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. पल्लवी शेडबाळ हिने रसायन …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयाची एस.एस.सी. परीक्षेत उज्जवल निकालाची परंपरा कायम

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयचा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२चा निकाल ९८.३५टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची पाच दशकांची अखंड परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली आहे विद्यालयातून एकूण २४३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामधील १०३विद्यार्थी  विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, तर ९६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये …

Read More »

शहापूरच्या मुक्तीधाम स्मशानभूमीतील पत्रे धोकादायक स्थितीत, मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष

बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरात विविध विकास कामे केली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील स्मशानभूमीच्या सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी देत असतात. प्रत्यक्षात सदाशिवनगर स्मशानभूमी वगळता शहरातील अन्य स्मशानभूमीच्या सुधारणेकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून उपनगर परिसरातील …

Read More »

पतीला मृत्यूच्या दाढेतून वाचविलेल्या आधुनिक सावित्रीचा गौरव

बोरगाव येथे पाटील दाम्पत्यांचा सत्कार : अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम निपाणी (वार्ता) : कुटुंब सांभाळत संकटकाळी आपल्या पतीस मृत्युच्या दाढेतून सुटका करण्यासाठी जेंव्हा महिला धडपडते तीच खरी सावित्री बनते. पती संदीप पाटील यांना किडनी देऊन त्यांचा प्राण वाचवलेल्या राजश्री पाटील या खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्री असल्याचे जाणुन बोरगाव येथील अष्टविनायक …

Read More »

पर्यावरण वाचवा वसुंधरा वाचवा : दिलीप शेवाळे

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा या शाखेत पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना न्यू सेकंडरी स्कूल भोजचे विज्ञान शिक्षक श्री. दिलीप शेवाळे सर म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे. ती घेतली तरच पृथ्वी व पृथ्वीतलावरील सर्वजण जगणार आहोत. जगातील …

Read More »

युवकाच्या खुनानंतर गौंडवाड गावात दगडफेक व जाळपोळ

बेळगाव : गौंडवाड ता. बेळगाव येथील एका युवकाच्या खुनानंतर संतप्त जमावाने शनिवारी रात्री दगडफेक, जाळपोळ केल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण गाव दहशतीच्या सावटाखाली आहे. जमावाने सुमारे 8 हून अधिक वाहने पेटविली असून गवत गंजींनाही आगी लावण्याचा प्रकार घडला आहे. गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सतीश राजेंद्र पाटील …

Read More »

भारत-दक्षिण आफ्रिका मालिका पावसाच्या हातात? हवामानाची स्थिती चिंता वाढवणारी

बेंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी मैदानावर खेळवला जाणार आहे. पण या निर्णायक सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. कारण बंगळुरु शहरात उद्या पावसाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मैदान असलेल्या परिसरात 88 …

Read More »

खानापूर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मध्यवर्तीची भेट!

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती (दिगंबर पाटील) गटाचे शिष्टमंडळ आज मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना भेटले. या बैठकीत एकी संदर्भात चर्चा करण्यात आली. सुरूवातीला मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सीमाप्रश्नाच्या दाव्यासंबंधीची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर खानापूर समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी खानापूर म. ए. समितीच्या एकीच्या प्रक्रियेचा सविस्तर वृत्तांत मध्यवर्तीच्या …

Read More »

24 तिर्थंकर विधानांतून विश्वशांतीचा संदेश… महा पट्टाभिषेक महोत्सव धार्मिक उत्साहात सुरू…

कोल्हापूर : अतिप्राचीन स्वस्तिश्री लक्ष्मीसेंन महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर रायबाग होसुर बेळगाव… या मठामध्ये नूतन मठाधिपती प पु विचारपट्ट 105 क्षुल्लक श्री भरतसेन स्वामी यांचा पट्टाभिषेक महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 24 तिर्थंकर विधानपूजा मोठ्या भक्तिभावनेनी सम्पन्न झाली.. या पूजेचे सौधर्म इंद्र इंद्रायणी पदी महावीर अण्णासाहेब पाटील सौ. स्वाती महावीर पाटील …

Read More »

अग्निपथच्या विरोधात आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे उद्या उपोषण

खानापूर : अग्निपथच्या विरोधात आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या रविवार दि. १९/०६/२०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शिवस्मारक चौक खानापूर येथे लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील तरूणांनी व जनतेनी उद्याच्या उपोषणामध्ये आमदार अंजलीताईंच्या सोबत सहभागी व्हायचे आहे व युवकांवरील अन्यायाला वाचा फोडायची आहे.

Read More »