संकेश्वर (प्रतिनिधी) : कुंकू सौभाग्याचे लेणे आहे. ते कपाळावर लावण्यात लाज कसली? सौभाग्यावती महिलांना फॅशनेबल टिकली पेक्षा कुंकूच शोभून दिसते, असे श्रीरामसेनेचे हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर यांनी सांगितले. ते गायकवाड मळा भागातील श्री रेणुका देवी मंदिरात आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा …
Read More »हलकर्णी येथे संग्रामदादा कुपेकर समर्थकांची बैठक संपन्न
चंदगड : हलकर्णी ता. चंदगड येथे आज संग्रामदादा कुपेकर यांच्या समर्थकांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये आगामी चंदगड तालुक्यातल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आगामी निवडणूकीसंदर्भातील सर्व अधिकार संग्रामदादा कुपेकर यांनी घ्यावेत, असे यावेळी कार्यकर्त्यांनी ठरवले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मा. भरमान्ना …
Read More »भारतीय संस्कृती रुजली पाहिजे : मिनाक्षी ए. पाटील
संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन-अडीच वर्षांत सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प झाले होते. आता परत कार्यक्रम होताना दिसत आहेत. आजच्या पिढीतील मुलींना सांस्कृतिक कार्यक्रमाची ओळख करुन देण्यासाठी ‘उत्तरायण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सौ. मिनाक्षी ए. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या, आमच्या एसडीव्हीएस शिक्षण संस्थेतर्फे उत्तरायण …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात 3 फेब्रुवारीपासून कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे सुधारित आदेश कोल्हापूर (जिमाका): ज्या जिल्ह्यात दि. 30 जानेवारी रोजी 18 वर्षावरील 90 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस व 70 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असतील त्या जिल्ह्यांना दि. 8 व 9 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या आदेशामधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. राज्य शासनाने …
Read More »वीट कामगारांच्या मुलासाठी तंबू शाळेचे महत्व वाढले
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड, सिगीनकोप, अंकले, गणेबैल, निट्टूर, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, निडगल, बरगाव आदी भागात वीट व्यवसाय मोठ्याप्रमाणात चालतो. या भागात वीट कामगार म्हणून यमकनमर्डी, गोकाक, हुक्केरी, हल्याळ, बेळगाव तालुक्यातील विविध गावचे नागरीक मोठ्या संख्येने नोव्हेंबर ते मार्चपर्यंत शिवारात स्थायीक होतात. हे वीट कामगार आपल्या सोबत शालेय विद्यार्थी, जनावरे, …
Read More »आरटीपीसीआर सक्ती मागे घेण्याची बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव (वार्ता) : व्यापार आणि उद्योग धंद्यांचे नुकसान होऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्यामुळे परराज्यातील प्रवाशांना बेळगावातील प्रवेशासाठी करण्यात आलेली आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव ट्रेडर्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील फोरमच्या शिष्टमंडळाने …
Read More »चापगांवात पारायण सोहळाला उत्साहात प्रारंभ
खानापूर (वार्ता) : चापगांव (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला बुधवारी दि. 2 रोजी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी सकाळी 9 वाजता पोथी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. 9 वा आणि 12 ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पीडीओ शिवलिंग मारीहाळ होते. दीपप्रज्वलन माजी सभापती सयाजी पाटील, …
Read More »असोगा रामलिंगेश्वर देवस्थानावरील प्रशासक हटविले, विश्वस्त समिती नेमणार
खानापूर (वार्ता) : असोगा (ता. खानापूर) जागृत देवस्थान श्री रामलिंगेश्वर देवस्थानावर गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारने प्रशासक नेमले होते. त्यामुळे असोगा गावच्या स्थानिक विश्वस्त समितीचा हक्क नव्हता. नुकताच बेळगांव जिल्ह्यातील 17 क श्रेणी देवस्थानावरील स्थानिक विश्वस्त कमिटी नेमण्यासंदर्भात सहायक आयुक्त हिंदू धर्मदाय विभागाच्यावतीने आदी सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने येत्या …
Read More »दहा रुपयांच्या नाण्याबाबत जनजागृती करा
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : भारतीय रिझर्व बँकेने दहा रुपयांचे नाणे हे अधिकृत चलन म्हणून 2016 साली घोषित केले. मात्र याचा वापर बेळगाव जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांनी अद्यापही केला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे कोठेच चलनात नसल्याचे निदर्शनास …
Read More »त्या घटनेविरोधात कुद्रेमनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे!
बेळगाव (वार्ता) : कुद्रेमनी ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक पाटील यांना अवमानकारकरित्या अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. एका महिलेने अर्वाच्च शिवीगाळ केलेली असताना या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. सदर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव कारणीभूत ठरत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे कुद्रेमनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta