Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूरात हुतात्मा दिनाबाबत म. ए. समितीकडून जनजागृती

खानापूर (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समिती व संयुक्त महाराष्ट्र समिती यांनी उभारलेल्या आंदोलनात सीमाभागीतील तसेच कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावचे कै. नागाप्पा होसुरकर व सीमाभागातील अनेक जणांना हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दि. 14 रोजी पत्रके वाटून खानापूर शहरासह तालुक्याच्या सीमाभागात जनजागृती केली. यावेळी सोमवारी दि. …

Read More »

तिलारीनगर येथे माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या 26 वर्षापूर्वीच्या आठवणी!

चंदगड (वार्ता) : तिलारीनगर ता. चंदगड येथील श्री माऊली विद्यालयात 1996-97मध्ये दहावीत शिकणार्‍या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी 25 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मुख्याध्यापक डी. एस. सातार्डेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी दीपप्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. एस. आर. पाटील, श्रीमती भातकांडे मॅडम, श्री. पवार यांनी हा …

Read More »

सुवर्ण विधानसौध समोर सामूहिक सूर्यनमस्कार

बेळगाव (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव सुवर्ण विधानसौधसमोर आज शुक्रवारी आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हलगा येथील सुवर्ण विधानसौधसमोर आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सदर उपक्रमाचे उद्घाटन बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते झाले. …

Read More »

खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात डांबण्यात आलेल्या शिवभक्तांची मुक्तता करावी

शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी बेळगाव (वार्ता) : खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात डांबण्यात आलेल्या शिवभक्तांची मुक्तता करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान केल्यानंतर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमधील …

Read More »

राजकीय मेळावा, निषेध, धरणे आंदोलनास ब्रेक

पदयात्राविरोधी याचिका निकालात, एसओपी पालनाचे हायकोर्टाचे निर्देश बंगळूर (वार्ता) : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 14) राज्य सरकारला कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीची (एसओपी) काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. जोपर्यंत मार्गसूची कार्यरत आहे, तोवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोणताही राजकीय मेळावा किंवा निषेध किंवा धरणे यांना परवानगी देऊ …

Read More »

राज्यात लॉकडाऊन लावणार नाही : आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर

बेंगळुर : लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आणता येत नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. बेंगळुरात आज पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण आणता येत नाही हे सिद्ध झाले आहे. याआधी दोनदा लॉकडाऊन लावल्याने जनतेला मोठा त्रास झाला …

Read More »

कोरोनाचे नियम पाळून हुतात्मा दिन; प्रशासनाची परवानगी

बेळगाव (वार्ता) : कोरोनाचे नियम पाळून 17 जानेवारी रोजी सकाळी हुतात्मा चौकात हुतात्मा दिन पाळावा अश्या सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केल्या आहेत. शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळाने हिरेमठ यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …

Read More »

मास्केनट्टीत हत्तीकडून ऊस पिकाचे नुकसान

खानापूर (वार्ता) : मास्केनट्टी (ता. खानापूर) येथील जोतिबा नागाप्पा भेंडीगीरी सर्वे नंबर ३०, नारायण नागापा लांडे सर्वे नंबर १३३ मधील २ एकरमधील ऊस, विठ्ठल नागापा लांडे सर्वे नंबर १३३ मधील २ एकर ऊस, हणमंत गिड्डापा शिंदोळकर सर्वे नंबर १२८ मधील ४ एकर ऊस, गोविंद लक्ष्मण गुंडूपकर सर्वे नंबर २२ मधील …

Read More »

खानापूर महामार्गावर गवताचा ट्रॅक्टर पलटी, वाहतुकीची कोंडी

खानापूर (वार्ता) : सध्या तालुक्यात भात मळण्याचा कामाला जोर आला आहे. त्यातच मळणी केलेले गवत घेऊन जाण्याची शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे. गुरूवारी दि. १३ रोजी सायंकाळी पणजी-बेळगाव महामार्गावरील खानापूर शहराजवळ ओमकार हाॅटेलसमोर गवताने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला आणि महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे अर्धातास वाहने अडकून राहीली. काही काळ …

Read More »

संकेश्वरसाठी आता किटवाड धरणाचा प्रस्ताव : खासदार संजयदादा मंडलिक

संकेश्वर (वार्ता) : सीमाभागातील लोकांना महाराष्ट्रातील किटवाड धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे मंत्रींबरोबर चर्चा करुन प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे खासदार संजयदादा मंडलिक यांनी सांगितले. संकेश्वर विश्रामधाम येथे आज कर्नाटक राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि दोन्ही राज्याचे पाटबंधारे अधिकारांशी चर्चा …

Read More »