मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी एका एका आमदाराचं मत फार महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. …
Read More »कंग्राळी बी.के. येथील सरकारी मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
बेळगाव : कंग्राळी बी.के. येथील सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेतील इयत्ता 7 वीच्या सन 1996-97 सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा समर्थ मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. सदर स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे शाळेचे निवृत्त शिक्षक जी. आर. पाटील आणि सौ. तरळे मॅडम यांच्यासह विरेश हिरेमठ, सैन्यातील जवान कपिल घाडी व जवान …
Read More »जायंट्स ग्रुप मेनतर्फे पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त रोप लागवड करण्यात आली. मंडोळी येथील डोंगरात वसलेल्या स्वयंभू बसवाण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत रोपे लावण्यात आली. जायंट्सचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मंडोळी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी कणबरकर, सारंग राघोचे उपस्थित होते . हिरेमठ यांनी, सजीव सृष्टीचे जगणे …
Read More »रोपे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार : ए. एच. मोतीवाला
पर्यावरण दिनी सत्कार निपाणी (वार्ता) : प्लास्टिकचा अतिवापर आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. परिणामी शुद्ध हवा मिळणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वृक्षारोपण ही काळजी गरज आहे. त्यामुळे येत्या काळात झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले. …
Read More »बेळगुंदी येथे हुतात्मा अभिवादन गांभीर्याने!
बेळगाव : 1986 मध्ये झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलन याप्रसंगी पोलिसांच्या गोळीबारात 6 जून रोजी बेळगुंदी येथे तिघा तरुणांनी हौतात्म्य पत्करले. सालाबादप्रमाणे या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम बेळगुंदीवासीय आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, …
Read More »अनिल देशमुख, नवाब मलिकांना राज्यसभेसाठी मतदान करता येणार? 8 जूनला सुनावणी
मुंबई : सध्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर ईडीने उद्यापर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. येत्या …
Read More »विजय नंदिहळ्ळी हेच विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष!
बेळगाव : विजय परशुराम नंदिहळ्ळी हेच विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन मंडळाने पाठविलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्यानेही विजय नंदिहळ्ळी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळास अनुमोदन दिले. त्यांनी पाठविलेले प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहेत. परंतु, काही …
Read More »गंगवाळी वनविभागात जागतिक पर्यावरण दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : पृथ्वीमातेचे आपापल्या विध्वंसक कृत्यांमुळे शोषण होत आहे. आणि आपली पर्यावरण प्रणाली लोप पावत आहे. यासाठी पुन्हा पर्यावरण प्रणाली संतुलनात आणण्यासाठी बरीच कारणे आवश्यक आहेत. म्हणून निरोगी आणि टिकाऊ वातावरण केवळ आपल्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. आपण नेहमी जबाबदार वर्तन दाखवुन हवा आणि पाणी तसेच वन्यजीवांचे संरक्षण …
Read More »राफेल नदाल चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचा चॅम्पियन!
22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले फ्रेंच ओपन अंतिम सामन्यात नॉर्वेचा कॅस्पर रुडवर मात करत राफेल नदाल याने आपणच लाल मातीचा बादशहा असल्याचे स्पष्ट केले. स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यांच्यात फ्रेंच ओपनचा अंतिम सामना रंगला. लाल मातीवरील निर्वावाद वर्चस्व गाजवत नदालने 6-3, 6-3, 6-0 असा हा सामना …
Read More »उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवासी ठार
देहरादून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे जाणारी बस दरीत काेसळून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार झाले. अपघातस्थळी एसडीआरएफचे जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या दुर्घटनेत १३ प्रवासी जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवाशांना घेवून बस उत्तरकाशीकडे निघाली हाेती. बसमध्ये २८ प्रवासी हाेते. बस दरीत काेसळली. स्थानिकांनी याची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta