Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

निवृत्त कर्नल ए. एम. ज्ञानकन यांचे निधन

  बेळगावातील सैनिक, मार्गदर्शक व चर्च नेते हरपले बेळगाव : भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी कर्नल ए. एम. ज्ञानकन (वय ८७) यांचे १६ फेब्रुवारी २०२६ रोजी निधन झाले. ते एक कर्तृत्ववान सैनिक, आदरणीय समाजनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. १९३८ साली जन्मलेल्या कर्नल ज्ञानकन यांनी आयुष्यभर देशसेवा आणि समाजसेवेला …

Read More »

दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि कडक शिस्त – पी.यू.सी. परीक्षेसाठी श्री. एम. एम. कांबळे यांची ठाम भूमिका

  बेळगाव : बेळगाव येथे पार पडलेल्या पी.यू.सी. द्वितीय वर्ष परीक्षा पूर्वतयारी बैठकीत जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी श्री. एम. एम. कांबळे यांच्या नेतृत्वाची ठसठशीत छाप उमटली. येत्या 28/02/2026 पासून सुरू होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व तयारीचा अत्यंत बारकाईने, चाणाक्ष बुद्धीने आणि अचूक नियोजनाने आढावा घेतला. त्यांच्या प्रत्येक सूचनेत शिस्त, जबाबदारी …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महाप्रसादाने सांगता

  बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहर परिसरातील बहुतांश मंदिरात आज सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून विविध भागातील मंदिरात अभिषेक प्रवचन आणि महापूजा असे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दक्षिण काशी …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संध्या राजन अणवेकर यांची दिवंगत मातोश्री शोभना बेंडिगेरी स्मरणार्थ एक लाखाची देणगी

  बेंगळुरू : बेंगळूरू येथे रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलन, पुरस्कार प्रदान सोहळा, प्रकट मुलाखत तसेच पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा डॉ. पुष्पा द्रविड यांच्या हस्ते संपन्न झाला. या साहित्यिक सोहळ्यास ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ. …

Read More »

डॉ. उमा कुलकर्णीनी मराठी साहित्याला कन्नड संस्कृतीची ओळख करून दिली : डॉ. पुष्पा द्रविड

  बेंगळूरू : कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा समृद्ध परंपरा लाभलेल्या असून कन्नड साहित्यातील अनेक महत्वपूर्ण कृतींचे मराठीत अनुवाद करून ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी मराठी साहित्यविश्वाला कन्नड संस्कृतीची खरी ओळख करून दिली. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणजे मराठी–कन्नड भाषिक ऐक्याचा गौरव होय, असे प्रतिपादन जागतिक दर्जाच्या चित्रकार, शिल्पकार …

Read More »

खानापुरात रविवारी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा

  मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारचे राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूलमध्ये होणाऱ्या या परीक्षेला खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने …

Read More »

मातोश्री ट्रॉफी ग्रामपंचायत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा उत्साहात

  बेळगाव : मातोश्री क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन, मण्णूर, यांच्या वतीने खास महाशिवरात्री निमित्त मण्णूर -आंबेवाडी -गोजगे अश्या तिन्ही गावाच्या मिळून मातोश्री ट्रॉफी नावाने ग्रामपंचायत प्रीमियर लीग हि क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचा उदघाटन सोहळा मण्णूर येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर अतिउत्साहात पार पडला. सर्व प्रथम मण्णूर येथील …

Read More »

सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

  बेळगाव : सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथे सन 2025-26 सालातील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा सौ.दिव्या संदिप कुंडेकर या होत्या, प्रमुख वक्त्या शाळेच्या माजी विद्यार्थीनी आणि निर्देशक, कौशल्य अभिवृद्धी केंद्र आणि अध्यक्षा महिला घटक व्हीटीयू डॉ. संध्या राजन अणवेकर त्याचबरोबर बेळगाव ग्रामीणचे …

Read More »

डॉक्टर दांपत्याकडून 37 जणांची फसवणूक; खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

  बेळगाव : एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे त्याचप्रमाणे रशियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून यमनापूर येथील डॉक्टर दांपत्याने बेळगाव शहरातील जवळपास 37 जणांची फसवणूक करून 75 लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉक्टर सुरज अशोक अनगोळकर हे …

Read More »

आयुष्यात एक दिवस अविस्मरणीय असावा यासाठीच वाढदिवस ज्येष्ठांसोबत साजरा : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांसमवेत वाढदिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वडीलधाऱ्या मंडळींसोबत वेळ घालवणे व त्यांचा आशीर्वाद घेणे हा होता. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवचैतन्य, उत्साह निर्माण व्हावा अशी आपली इच्छा होती. दैनंदिन जीवनातील समस्या दूर ठेवून त्यांच्या आयुष्यात एक दिवस अविस्मरणीय असावा यासाठी आपण आपला वाढदिवस ज्येष्ठांसोबत …

Read More »