Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

पांढऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे हलशी-मडवाळ रस्ता तुटण्याचा संभव

खानापूर (प्रतिनिधी) : यंदा खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे अनेक रस्त्याची दयनिय अवस्था झाली. असाच प्रकार खानापूर तालुक्यातील मडवाळ-हलशी रस्त्यावर झालेला आहे.याबाबतची माहिती अशी की, हलशी- मडवाळ रस्त्यावर बांधण्यात आलेला पूल हा माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून ८६ लाख रूपये खर्चून उभारण्यात आला आहे.मात्र पांढऱ्या नदीच्या …

Read More »

केरळमध्ये लॉकडाऊन; 66 टक्के जनता कोरोनाबाधित

तिरुअनंतपुरम (बेळगाव वार्ता) : मागील 24 तासांत विक्रमी कोरोना रुग्ण आढळल्याने केरळ सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. राज्यात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल. केरळमध्ये मंगळवारी एका दिवसात 22 हजार रुग्ण आढळले. हे देशभरात आढलेल्या एकूण रुग्णांच्या 50 टक्के आहेत. त्यामुळे येथे चिंता वाढली आहे. केरळ सरकारने बकरी ईद …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर

मुंबई (बेळगाव वार्ता) : राज्य शासनाचा 2021 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे …

Read More »

खानापूर भाजप युवा मोर्चाकडून मोक्षधामाची स्वच्छता

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठच्या बाजुला असलेल्या मोक्षधामाची झालेली अवस्था मोठी बिकट होती. कारण नुकताच मुसळधार पावसाने खानापूर शहरासह तालुक्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरातून मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे पाणीच पाणी झाले.दुर्गानगर, मारूतीनगरसह शहरात पाणीच पाणी झाले. मलप्रभा नदीच्या प्रवाहातून …

Read More »

रेल्वे स्टेशन रोडवर धोकादायक खड्डा, खानापूर नगरपंचायतीचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : शहरातील तहसील कार्यालय ते रेल्वे स्टेशनपर्यंत असलेल्या रस्त्यावर नगरपंचतीच्याजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा धोकादायक आहे. खानापूर शहरात नुकताच मुसळधार पावसाने रस्त्याची वाट लावली त्यामुळे प्रवाशी वर्गाचे आतोनात हाल होत आहेत.असे असताना खानापूर शहरातील रेल्वे स्टेशनवर रोडवरील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला भला मोठा खड्डा गेल्या …

Read More »

मुसळधार पावसाने करंजाळमध्ये भात शिवाराचे प्रचंड नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्याला नुकताच झालेल्या महाभयंकार अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील बिजगर्णि ग्राम पंचायत हद्दीतील करंजाळ गावच्या सुब्राव मऱ्याप्पा पाटील यांच्या सर्वे नंबर ९ मधील तीन एकर भात जमिनीचे तसेच दोन एकर माळ जमिनीचे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.या शिवारात बांधाचे पाणी …

Read More »

खानापूर विद्यानगरात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात जाणाऱ्या तालुका मलप्रभा क्रिडांगणाजवळील रस्त्याची दुर्दशा झाली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगर मयेकर नगरात जाणाऱ्या रस्त्याचे दुरूस्तीचे काम झालेच नाही. त्यामुळे याभागात गुडघाभर चिखल पावसाळ्यात होतो. त्यामुळे वाहने अडकण्याच्या घडना घडतात. नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी विद्यानगर, मयेकर नगरातील नागरिकांतून …

Read More »

संकल्प फाऊंडेशनने दिली चाफ्याचा वाडा शाळेला दिली भेट

खानापूर (प्रतिनिधी) : संकल्प फाऊंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्यातील चाफ्याचा वाडा येथील लोअर प्रायमरी शाळेला नुकताच भेट दिली आणि विद्यार्थांना मास्क व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय शाळेतील मूलभूत सुविधांची विचारपूस करून शाळेला होईल तेवढी मदत करण्याचा पुढाकार घेतला.सुरूवातीला शाळेच्या सहशिक्षिका सौ. निलम शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.. संकल्प फाऊंडेशनच्यावतीने शाळेसाठी …

Read More »

खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने ३३३ घरे जमीनदोस्त

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात नुकताच थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत ३३३ घरे जमीनदोस्त झाली आहेत.शहरासह तालुक्यातील विविध गावात मुसळधार पावसामुळे घरे पडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.या कुटूंबाना तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.मागील आठवड्यात गुरूवारी व …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी बसवराज बोम्मई शपथबद्ध!

बेंगळुरू: गेल्या कांही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून आज बुधवारी सकाळी बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज सकाळी 11 वाजता बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपद व गोपनीयतेची शपथ देवविली. शपथविधीप्रसंगी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपचे केंद्र व राज्यातील …

Read More »