Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

आम्ही छत्रपती घराण्याचा मान नक्कीच राखू, पण उमेदवार शिवसेनेचाच असेल : संजय राऊत

मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवारीसाठी सध्या संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेकडून परस्परांविरोधात प्रेशर टॅक्टिक्स वापरल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा मान राखतील, असा विश्वास आहे, हे वक्तव्य करून संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला होता. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही तितक्याच तत्परतेने प्रत्युत्तर दिल आहे. …

Read More »

टीम इंडियात धवनला स्थान न दिल्याने भडकला सुरेश रैना, केले मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार्‍या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 संघामध्ये दिनेश कार्तिकचे पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने फिनिशरची कामगिरी चांगली बजावली होती, त्यामुळे भारतीय निवडकर्त्यांनी त्याला टी-20 मालिकेसाठी संघात सामील केले आहे. दिनेश कार्तिकची संघात निवड झाली पण शिखर …

Read More »

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीत, भाच्याची ईडीसमोर कबुली

मुंबई : ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिलीय. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. अलीशाह पारकरने …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे यांना अमेरिकेत जीवनगौरव प्रदान

बेळगाव : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. न्यूयॉर्क येथे शनिवारी झालेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकात व महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा देत समाज आणि राष्ट्र …

Read More »

खानापूर भाजपच्यावतीने एसएसएलसी परीक्षेत तालुक्यात व्दितीय आलेल्या प्रियांका देवलतकरचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ताराराणी हायस्कूलची विद्यार्थीनी व मणतुर्गा गावची प्रियांका पुंडलिक देवलतकर हिने दहावीच्या परीक्षेत ६१७ मार्क (९८.७२) घेऊन तालुक्यात द्वितीय येण्याचा मान मिळविला. त्यामुळे मणतुर्गा गावाचे नाव तालुक्यात प्रसिध्द केले. म्हणून भाजप तालुका सेक्रेटरी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

कोल्हापूर- बंगळूर बसचा हुबळीजवळ भीषण अपघात, ८ ठार, २८ जखमी

बेळगाव : कोल्हापूरहून बंगळूरकडे जाणारी खासगी बस आणि तांदूळ वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन 8 जण ठार झाले आहेत. मध्यरात्री 12 च्या सुमारास हुबळी जवळ तारीहाल क्रॉस नामक फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये ट्रक चालक, वाहक तसेच आणखी एकटा आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे. बाबासाब (55, चिकोडी), …

Read More »

आज गुजरात- राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर-१ सामना

कोलकाता : वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा मारा आणि दर्जेदार विजयवीरांमुळे गुजरात टायटन्सचे मंगळवारी माजी विजेत्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या क्वालिफायर-१ सामन्यात पारडे जड मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांची तंदुरुस्ती सिद्ध करणाऱ्या हार्दिक पंड्याने ‘आयपीएल’मध्ये नवख्या गुजरातचे नेतृत्व करताना फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर कामगिरी करीत संघाला बाद …

Read More »

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट

नदी प्रवाह, पूर व्यवस्थापन तयारीची पाहणी बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृष्णा नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेल्या चिकोडी व कागवाड तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चिक्कोडी येथून मांजरी पुलाला भेट दिली आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे कृष्णा नदीतील पाण्याचा प्रवाहाची माहिती घेतली. यडूर, कागवाड …

Read More »

विद्यार्थ्यांचं भविष्य घडविणारी एसडीव्हीएस शिक्षण संस्था : ए. बी. पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : आमची श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडविणारी शिक्षण संस्था बनल्याचे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. कला-विज्ञान महाविद्यालय सभागृहात दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते.त्यात माजी मंत्री ए. …

Read More »

गोमटेश स्कूलमध्ये शिक्षकांसाठी कार्यशाळा

प्रा. सोहन  तिवडे यांचे मार्गदर्शन : कोरोनामधील शिक्षणाचा आढावा निपाणी (वार्ता) : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. सोहन तिवडे यांची शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे शाळांचे कामकाज ठप्प झाले होते. या दरम्यान …

Read More »