Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

महिलांनी मुलांच्या आरोग्याबरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. राजश्री अनगोळ

बेळगाव (वार्ता) : मुलांच्या आरोग्याची व सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी सर्व महिला घेत असतात. महिलांनी मुलांच्या आरोग्याबरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे उद्गार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांनी काढले. तारांगण व संजना मेहंदी डिझायनर तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉ. राजश्री अनगोळ यांचा सत्कार समारंभ व शिल्पा …

Read More »

कन्नड भाषा शिकायला हवी : अमर नलवडे

संकेश्वर (वार्ता) : आपण कर्नाटक राज्यात राहत असल्याने येथील कन्नड भाषा लिहायला, वाचायला शिकायला हवी असल्याचे संकेश्वर मराठा समाज सोसायटीचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले. ते सोसायटीच्या 14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित मराठा समाजाती दहावी-बारावी परिक्षेची व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्काराने सन्मान करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत जयप्रकाश सावंत यांनी …

Read More »

निपाणी येथे कडकडीत बंद, अभूतपूर्व मूकमोर्चा

निपाणी तालुक्यातील अनेक गावात बंद : पुतळा विटंबनेचा निषेध निपाणी : छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याच्या विटंबने निषेधार्थ येथील सर्वपक्षीय नेते मंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी सोमवारी (ता. 20) शहरात मूकमोर्चा काढला. त्यामध्ये शहरातील दहा हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर दोन्ही घटनेतील दोषींवर कारवाई करण्याच्या …

Read More »

हलशी येथे बसवाण्णा महाराजांच्या फोटोची विटंबना

खानापूर (वार्ता) : बेळगाव : कर्नाटकाची राजधानी बेंगळूरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि अनगोळातील वीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेवरून निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण हळूहळू थंड होत असतानाच खानापूरात जगज्योती बसवेश्वरांच्या फोटोची आणि लाल-पिवळ्या ध्वजाची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक हलशी गावात लाल-पिवळा जाळून …

Read More »

माजी सभापती आम. रमेश कुमार यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाची निदर्शने

बेळगाव : काँग्रेसचे आमदार आणि माजी सभापती रमेशकुमार यांनी विधानसभेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्या विरोधात बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आज सुवर्ण विधानसौध नजिक निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत, रमेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आम. रमेशकुमार यांनी अत्यंत खालच्या …

Read More »

राज्याच्या हिताविरोधात असणार्‍यांवर देशद्रोहाची कारवाई करणार : मुख्यमंत्री बोम्माई

बेळगाव (वार्ता) : बेळगाव सीमाभागात सातत्याने अशांतता मोजवण्याचे काम म. ए. समिती करत आहे. म. ए. समिती राज्याच्या विरोधात कारवाया करत आहे. राष्ट्रपुरुषांचा अपमान केला जात आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्याच्या हिताचा विरोधात काम करणार्‍यांविरोधात देशद्रोहाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज …

Read More »

हेब्बाळच्या डॅममध्ये पडून महिलेचा मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) गावची मुलगी व गणेबैल गावची सुन श्रीमती लक्ष्मी मल्हारी गेजपतकर (वय 34) हिचा हेब्बाळच्या डॅममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. 20 रोजी घडली. हेब्बाळ येथील मारूती कल्लापा गुरव यांची कन्या असून तिचे सासर गणेबैल आहे. तिच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा …

Read More »

शहर शिक्षकांच्या क्रीडास्पर्धाना प्रारंभ

बेळगांव (वार्ता) : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित संतमीरा शाळेच्या 40 वर्षंपुरती निमित्त बेळगाव शहर शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धांना शनिवार ता. 18 डिसेंबरला संतमीरा शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत 500 हून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला …

Read More »

मंत्र्याच्या राजीनाम्यावर काँग्रेस तर समितीवर बंदीसाठी निजद कडून दोन्ही सदनात गोंधळ

  बेळगाव – हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाने विद्यमान भाजप मंत्र्याच्या जमीन घोटाळा आणि राजीनाम्याच्या मागणीवर ताठर भूमिका घेतली आहे. याचवेळी निधर्मी जनता दलाच्या आमदारांनी संगोळी रायण्णा यांच्या पुतळा अवमान प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बंदी घालण्याच्या मागणीवरून दोन्ही सदनात गोंधळ …

Read More »

मास्केनट्टीत युवकाचा तळ्यात पडून मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : मास्केनट्टीत (ता.खानापूर) येथील जानु विठ्ठल जंगले (वय १८) याचा मास्केनट्टी गावापासुन जवळ असलेल्या अमृत गावडा तळ्यात रविवारी दि. १९ रोजी दुपारी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मास्केनट्टी गावचा युवक जानु विठ्ठल जंगले मानसिक दृष्ट्या कुमकवत होता. तो अचानक तळ्याकडे गेल्याने तो …

Read More »