बेळगाव (प्रतिनिधी) : राणी चन्नम्मा विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी मार्गसूचीनुसार सीबीसीएस अभ्यासक्रम लागू केला असून यानुसार डॉ. राजेंद्र पोवार यांनी संपादित केलेल्या द्वितीय सत्राच्या हिंदी विषयाच्या चार पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी राणी चन्नम्मा विद्यापीठात व्हाईस चान्सलर प्रो. एम. रामचंद्र गौडा व रजिस्ट्रार प्रो. बसवराज पद्मशाली यांच्या …
Read More »मांडेदुर्ग येथे कृषीकन्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरी येथीलमहात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या माया महादेव पाटील (रा. मांडेदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे कृषी सप्ताह साजरा झाला.ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये माती परीक्षण, कलम पद्धत, बागायती …
Read More »येडियुराप्पा यांचे पंतप्रधानांना दरमहा 1.5 कोटी लसीचे डोस देण्याचे आवाहन
बेंगळूर : कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काय काय तयारी करण्यात आली याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत डिजीटल माध्यमातून बैठक घेतली आहे. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाही सहभागी झाले होते. यावेळी येडियुराप्पा यांनी पंतप्रधान मोदींकडे महिन्याला 1.5 …
Read More »बारावीचा 20 जुलैला निकाल
बंगळूर : कोरोना संसर्गामुळे रद्द झालेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षेचा निकाल 20 जुलै रोजी राहीर करण्यात येणार आहे. पदवीपूर्व परीक्षामंडळाने निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे. पीयूसी बोर्डाच्या संचालिका स्नेहल यांनी 20 जुलै रोजी बारावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल असे सांगितले. निकाल 20 जुलै रोजी विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित केला …
Read More »खानापूरात शिरशी-बेळगाव बस ड्रायव्हरला मारहाण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ शिरशीहून बेळगावकडे जाणाऱ्या बसला आडवून ड्रायव्हरला मारहाण करून रक्तबंबाळ केले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरशीहून बेळगावकडे जाणारी शिरशी- बेळगाव बस खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ आली असता मागुन आलेल्या कारमधुन काही युवकांनी बस थांबवुन ड्रायव्हरला मारहाण केली. यात त्याच्या नाकाला जबर मारहाण झाल्याने …
Read More »कालकुंद्रीच्या विलास पाटील यांची कोकण विभागीय आयुक्तपदी निवड
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री (ता.चंदगड) येथील विलास बाळाराम पाटील यांची कोकण विभागाच्या आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. विलास पाटील यांच्या विभागीय आयुक्त म्हणून चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. कालकुंद्री येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत त्यांचे …
Read More »चंदगड तालुका काँग्रेसकडून इंधन व महागाई विरोधात आंदोलन…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्य तेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर सर्वत्र आंदोलन होत आहेत. आज चंदगड तालुक्यामधे चंदगड तालुका युवक काँग्रेसकडून …
Read More »कणकुंबी आणि अनमोडात चेकपोस्ट उभारणी
खानापूर : शेजारच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंटचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील चोर्ला राज्यमार्गावरील कणकुंबीत चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. चोलामार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अथवा कोरोना लसीकरण झाल्याचा दाखला दाखविणाऱ्यांनाच प्रवेश दिला …
Read More »तेरा वर्षीय बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील एका मुलीचा डेंग्यूमुळे आज शुक्रवारी दुपारी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूमुळे गावात डेंग्यू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील मरगाई गल्ली, हलगा येथील 13 वर्षीय बालिका हर्षदा भीमराव संताजी असे डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. गेल्या कांही दिवसापासून हर्षदा …
Read More »शाळा खोल्या दुरूस्तीसाठी चापगाव ग्रा. पं.चे निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील चापगांव मराठी प्राथमिक शाळेच्या तीन खोल्या आणि कन्नड प्राथमिक शाळेची खोली अशा चार खोल्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा शिक्षण खात्याच्यावतीने चारही खोल्या लवकरात लवकर दुरूस्त करून विद्यार्थी वर्गाची सोय करावी. अशा मागणीचे निवेदन शिक्षण खात्याच्या बीईओ कार्यालयाला देण्यात आले. यावेळी बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta