Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

अखेर बुडाची बैठक संपन्न; विकासकामांवर झाली चर्चा

बेळगाव : बुडाच्या अध्यक्षपदावरून गुळाप्पा होसमनी यांची उचलबांगडी झाल्यानंतर अखेर आज सोमवारी नूतन अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बुडा बैठक पार पडली. बैठकीत शहरातील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. बुडाचे माजी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी आणि स्थानिक भाजप आमदारांमधील वितुष्टामुळे यापूर्वी बुडाने बोलाविलेल्या दोन बैठका कोरम अभावी रद्द करून …

Read More »

धार्मिकस्थळ संरक्षण मसूद्याला राज्यपालाची मंजूरी

अधिकार्‍यांच्या स्वयंप्रक्रीयेला स्थगिती बंगळूरू : कर्नाटक सरकारने कर्नाटक धार्मिक संरचना (संरक्षण) कायदा अधिसूचित केला आहे, तो विधानसभेने मंजूर करून एक महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यावर सही केली आहे. यामुळे अचानक मंदिरे उद्ध्वस्त करणाच्या अधिकार्‍यांच्या स्वयंप्रक्रीयेला स्वाभाविकपणे स्थगिती मिळाली आहे. हा कायदा सार्वजनिक ठिकाणी बांधलेल्या धार्मिक वास्तूंना …

Read More »

पडद्याआड समाजसेवकांच्या सत्काराबाबत सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशन आवाहन

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाचा प्रतिकूल काळात गरजू लोकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना दिलासा मिळवून देणार्‍या मात्र अद्याप प्रसिद्धीपासून दूर पडद्याआड असलेल्या सेवाभावी निस्वार्थ कार्यकर्त्यांचा शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याद्वारे त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच यासाठी जनतेने आपल्या भागातील संबंधित व्यक्तीच्या नांवाची शिफारस करावी, …

Read More »

असहाय्य वृद्धेला दिला मदतीचा हात!

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्याकडेला गेल्या चार दिवसांपासून असहाय्य अवस्थेत पडून असलेल्या एका वृद्धेला तेथील ऑटोरिक्षा चालकांनी हेल्प फॉर नीडीच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली. बेळगाव रेल्वे स्थानका बाहेर रस्त्याशेजारी गेल्या चार दिवसापासून एक वृद्ध महिला अंगावरील जीर्ण कपड्यानिशी असहाय अवस्थेत पडून होती. सदर …

Read More »

काळ्यादिनी व कोल्हापूरातील धरणे आंदोलनासंदर्भात खानापूर म. ए. समितीकडून जागृती

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळा दिन मराठी भाषिक जनतेने गांभीर्याने पाळावा. सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी कडकडीत हरताळ पाळावा. तसेच शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 4 पर्यंत दसरा चौक कोल्हापूर येथे सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष्य वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

’भुमी सेक्शन’मधील समस्या लवकरच दूर

तहसीलदार डॉ. भस्मे : रयत संघटनेने मांडल्या समस्या निपाणी : गेल्या तीन वर्षापासून अतिवृष्टी आणि महापुराचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. नदीकाठावरील अनेक गावातील घरे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. पण आजतागायत नुकसान भरपाई मिळालेली नाही. मात्र सध्या एकरी केवळ 4 हजार 500 रुपये घोषणा करून शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. …

Read More »

बेळगावात रंगणार कीर्तन सोहळा : इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठरणार पर्वणी

आज रोवण्यात आली शामियान्याची मुहूर्तमेढ बेळगाव : श्री हरी विठ्ठल रुक्मिणी अभिवृद्धी वारकरी सेवा संघ बेळगाव यांच्यावतीने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आदर्श नगर, वडगाव येथील आदर्श विद्यामंदिर मैदानावर पारायण आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पारायण आणि कीर्तन सोहळा स्वामी यांची मुहूर्तमेढ नुकतीच घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे …

Read More »

नवहिंद पतसंस्थेला 91 लाखांचा नफा

सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; सभासदांना 12 टक्के लाभांश येळ्ळूर : नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला आर्थिक वर्षात 91 लाख 68 हजार रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना 12 टक्के लाभांश देण्यात येईल, अशी माहिती चेअरमन उदय जाधव यांनी 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना दिली. जाधव पुढे म्हणाले, संस्थेकडे 266 कोटी रुपयांचे …

Read More »

वन हक्कासाठी खानापूर तहसील कार्यालयावर विराट मोर्चा

अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन खानापूर (प्रतिनिधी) : वन हक्कासाठी काढण्यात आलेल्या तहसील कार्यालयावरील मोर्चाला निवेदन स्विकारण्यास तहसीलदार रेश्मा तालिकोटी उपस्थित नव्हत्या. तालुक्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेऊन न्याय देऊ असे फोनव्दारे सांगून उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक पिढ्यापासून जंगलात …

Read More »

भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांचे स्वागत

बेळगाव : आजपासून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गांना सुरुवात झाली असून यानिमित्ताने आज बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील सरकारी प्राथमिक मराठी आणि कन्नड शाळेमध्ये भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण देशभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नुकतेच सहावी ते दहावी पर्यंतच्या वर्गांना …

Read More »