Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

…म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; करवेची कोल्हेकुई

बेळगाव : कर्नाटक राज्योत्सव दिन धुमधडाक्यात साजरा करण्याऐवजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन आचरणात आणण्यात येतो, यामुळे या समितीवर संपूर्णपणे बंदी घालण्याची मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रत्येक वर्षी 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काळा दिन पाळण्यात येतो. याविरोधात करवे संघटनेने कन्नड भाषिकांचा अपमान होत असल्याचे म्हटले …

Read More »

माध्यान्ह आहारात लवकरच दुधाचे वाटप

बेंगळुरू : शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीचे पर्यंतचे वर्ग पूर्वपदावर आल्यामुळे तयार माध्यान्ह आहार वितरणास सुरुवात झाली असून लवकरच विद्यार्थ्यांना क्षीरभाग्य योजनेअंतर्गत दुधाचे वाटप केले जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 23 ऑगस्टपासून नववी ते दहावी तर 6 सप्टेंबरपासून इयत्ता सहावी …

Read More »

सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

बंगळूरू : कर्नाटक सरकारने बुधवारी (ता. 27) आपल्या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्त्यात (डीए) वाढ करून दीपावलीची भेट दिली आहे. सरकारी कर्मचार्‍यांचा डीए आता त्यांच्या मूळ वेतनाच्या 21.5 टक्क्यांवरून 24.5 टक्के करण्यात आला आहे. तीन टक्के डीए वाढविल्याचे वित्त विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढ पूर्वलक्षीपणे लागू …

Read More »

दुर्गम भागात 100 शिधापत्रिकांमागे एक रेशन दुकान

राज्य सरकारचा निर्णय : डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट बंगळूरू : कर्नाटक सरकारच्या योजनेनुसार सर्व काही चालले तर, कर्नाटकातील दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना रेशन विकत घेण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार नाही किंवा ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तृतीय पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कारण, रेशन दुकानांपर्यंत प्रवेश नसलेल्या सर्व दुर्गम भागात रास्त …

Read More »

‘तो’ व्यवहार्य तोडगा जनतेसमोर मांडावा

मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एकेकाळी सुचविलेला व्यवहार्य तोडगा अंमलात आणावा. याकडे महाराष्ट्रातील नेतेमंडळींचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन

महाराष्ट्र एकीकरण खानापूर युवा समितीतर्फे इशारा बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे.युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी खानापूर बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक आनंद शिरगुप्पीकर यांची भेट घेऊन बस सेवा सुरळीत करण्याबाबत चर्चा केली. यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील …

Read More »

येळ्ळूरमधील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक संपन्न

येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची दुसरी बैठक रविवार ता. (24) रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी विद्यालयच्या सभागृहात, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. त्यानंतर सर्वांच्या विचारांती चर्चा करून येळ्ळूरमधील व नोकरीनिमित्त बाहेर गावी …

Read More »

नेहरूनगर येथे विविध मान्यवरांचा नागरी सत्कार

बेळगाव : नेहरूनगर येथे नेहरूनगर रहिवाशांच्यावतीने विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नेहरूनगर येथील बसवाण्णा महादेव देवस्थान कमिटी, बसवाण्णा महादेव को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नेहरुनगर शिवजयंती उत्सव मंडळ, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि नेहरू नगर महिला मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.भाजप ओबीसी युवा …

Read More »

मराठी भाषिकांचा न्यायहक्कासाठी एल्गार!

भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे सर्व अधिकारी देण्याची म. ए. समितीची मागणी बेळगाव (वार्ता) : मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबवावा आणि भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे सर्व अधिकार मराठी भाषिकांना देण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला विराट मोर्चा पोलिसांचा विरोध झुगारून यशस्वी करण्यात आला. …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समिती व युवा समितीचा उत्स्फूर्तपणे सहभाग

बेळगाव (वार्ता) : आज सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने आयोजित केलेल्या महामोर्चाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. आपल्या न्याय हक्कासाठी व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस गोपाळराव देसाई, गोपाळ …

Read More »