अध्यक्ष खर्गेंशी दोन्ही नेत्यांची चर्चा बंगळूर : राज्य काँग्रेसमधील सत्तावाटपाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील स्पर्धा निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, या तणावाच्या पार्श्वभूमीवर एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हायकमांड कोणता फॉर्म्युला पुढे आणते, याकडे राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे लक्ष केंद्रित …
Read More »सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांना अखेरचा जय महाराष्ट्र!
बेळगाव : आपलं संपूर्ण आयुष्य सीमा लढ्यासाठी समर्पित करणारे सीमा तपस्वी, सीमा सत्याग्रही रामा शिंदोळकर यांना काल रात्री देवाज्ञा झाली. सीमा लढ्यात नेहमी अग्रभागी असणाऱ्या या योद्धाने अखेरचा “जय महाराष्ट्र” म्हणत सीमावासीयांचा अखेरचा निरोप घेतला. त्यांचा सीमा लढ्यातील प्रवास कधीही न थकणारा व थक्क करणारा असा होता. आजपर्यंत झालेल्या …
Read More »जांबोटी माध्यमिक विद्यालयात परमवीरांचे पूजन
खानापूर : परमवीरचक्रानी सम्मानीत आपल्या शुरविरांकडून आपण सदैव प्रेरणा घेउया व देशासाठी आपण सकारात्मक कार्य करुया. आता देशासाठी मरण्यापेक्षा सजग नागरिक म्हणून जगुया, असे विचार किशोर काकडेनी मांडले. विश्व भारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयात झालेल्या परमवंदना या परमवीरचक्रानी सम्मानित 21वीराना पुष्पांजली अर्पण करुन त्याना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात …
Read More »13 डिसेंबर रोजी 14 तालुक्यांमध्ये एकाच वेळी लोक अदालत
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात येत्या डिसेंबर १३ रोजी एकाच वेळी सर्व १४ तालुक्यांमध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांना वाहतूक चलन दंडावर ५० टक्के सवलतीसह दंड भरता यावा यासाठी शहराच्या विविध भागांत विशेष काउंटर उभारले जातील, अशी माहिती बेळगावचे प्रधान आणि जिल्हा न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिली. …
Read More »कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांच्या कारला अपघात
बेळगाव : चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी नजीक कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांच्या वाहनाचा अपघात झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चुन्नप्पा पुजारी यांची कार हंचिनाळकडून नागरमुन्नोळीमार्गे कब्बूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती …
Read More »विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना
सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगाव हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांनी दैनंदिन शालेय शिक्षणासह क्रीडाक्षेत्र आणि आधुनिक तंत्रज्ञान विभागात चांगले कार्य करीत आहेत. त्यामुळे दरवर्षी भरणाऱ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा, तालुका आणि राष्ट्रीय स्पर्धेत विविध उपकरणांची निर्मिती करत आहेत. त्याची शालेय शिक्षण क्षेत्राने दखल घेतली आहे. …
Read More »नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालय, बिडीच्या विद्यार्थीनींचे नेत्रदीपक यश
खानापूर : जी. ई. सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल पदवीपूर्व महाविद्यालय बिडीच्या दोन विद्यार्थीनींनी जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले असून, बिडी परीसरात त्यांच्ये खूप खूप अभिनंदन होत आहे. बेळगांव येथील महेश पी. यू. काॅलेजमध्ये बेळगांव जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले होते. कु. दीपा इटगी या प्रथम पी.यू. …
Read More »कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करू : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्धार
बेळगाव : सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 8 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करून तो यशस्वी करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे झालेल्या …
Read More »हलगा येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून 5 जणांना अटक
बेळगाव : हलगा येथे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगारी अड्ड्यावर धाड टाकून बागेवाडी पोलिसांनी अंदर बाहर जुगार खेळणाऱ्या पाच तरुणांना अटक करून त्यांच्या जवळील पाच हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. विजयनगर हालगा येथील तलावाजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगारी अड्डा सुरू होता. बागेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या …
Read More »मराठा समाजसेवा मंडळाचा 94 वा वधू-वर पालक मेळावा संपन्न
बेळगाव : वडगाव येथे मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीने 16 नोव्हेंबर 2025 रोजी संघटनेचा 94 वा वधू-वर पालक मेळावा आयोजित करण्यात आला हो.ता मराठा समाज सेवा मंडळ संचालित वधु वर पालक मेळावा कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गोविंद पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हवाई दलाचे निवृत्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta