Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

गोवावेस जवळील अनुग्रह हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

  बेळगाव : गोवावेस येथील अनुग्रह या हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यावेळी हॉटेलमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हॉटेलमधील पेटणाऱ्या फर्निचरच्या आवाजाने जागे झालेल्या आसपासच्या लोकांनी आगीची माहिती हॉटेलचे मालक सुधाकर पुजारी यांना दिली. त्याचप्रमाणे तात्काळ अग्निशामक …

Read More »

खासदार इराण्णा कडाडी यांचा खानापूर समितीतर्फे निषेध

  मराठी भाषिक संतप्त खानापूर : सीमाप्रश्न संपला आहे असे वादग्रस्त विधान करणाऱ्या खासदार इराण्णा कडाडी यांचा खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने तीव्र निषेध केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सदर विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला असून असे वक्तव्य मराठी …

Read More »

कॅन्सरग्रस्त चिमुकलीच्या उपचारासाठी ‘यंग बेळगाव फाउंडेशन’चा पुढाकार

  बेळगाव : रक्तकर्करोगाशी झुंजणाऱ्या १० वर्षीय आराध्या कृष्णा पार्लेकर हिच्या मदतीसाठी ‘यंग बेळगाव फाउंडेशन’ पुढे सरसावले आहे. फाउंडेशनच्या सदस्यांनी आराध्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करत समाजालाही मदतीसाठी आवाहन केले आहे. ‘यंग बेळगाव फाउंडेशन’ने ‘टी-सेल ॲक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया’ नावाच्या एका दुर्मीळ आणि गंभीर रक्तकर्करोगाशी धैर्याने लढा देणाऱ्या १० वर्षीय …

Read More »

चव्हाट गल्लीतील एका घराची पडझड

  बेळगाव : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगावमधील चव्हाट गल्लीतील एका घराची पडझड होऊन दोन ऑटो रिक्षा आणि एका दुचाकीचे नुकसान झाले. बेळगावमधील चव्हाट गल्लीतील कल्याण चौकाजवळ असलेले किसन शहापूरकर यांच्या मालकीचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. सुदैवाने, घरात कोणीही राहत नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, घरासमोर …

Read More »

जिल्हा अल्पसंख्यांक समितीच्या नूतन नामनिर्दिष्ट सदस्यांचा सत्कार

  बेळगाव : बेळगाव जिल्हा अल्पसंख्यांक विभागाने गुरुवारी कर्नाटकमधील अल्पसंख्यांक विकास महामंडळ (KMDC) तर्फे नियुक्त झालेल्या जिल्हा अल्पसंख्यांक समितीच्या नव्याने नामनिर्दिष्ट सदस्यांचा सत्कार केला. कर्नाटकमधील सरकारने मागील महिन्यात जिल्हास्तरीय सहा सदस्यांची समिती नियुक्त केली होती. सदर समिती विविध अल्पसंख्यांक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यावतीने चार्टर्ड अकाउंटन्ट श्री. तुकेश पाटील यांचा सन्मान

  बेळगाव : बेळगावचे युवा सी.ए. श्री. तुकेश पाटील यांचा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या वतीने सी.ए. दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. वाणिज्य क्षेत्रात, व्यवसाय आणि उद्योग धंद्यामध्ये प्रगती साधताना सर्व सी. ए. मंडळींचे कार्य महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे, असे अध्यक्ष सचिन केळवेकर …

Read More »

विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा; संत मीरा, भातकांडे, शांतीनिकेतन, स्वामी विवेकानंद उपांत्य फेरीत

  बेळगाव : गणेशपुर रोड येथील गुड शेफर्ड शाळेचे आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हे हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात संत मीरा अनगोळ, गजाननराव भातकांडे, शांतीनिकेतन स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव उपांत्य फेरीत प्रवेश केला. …

Read More »

सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

  बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री बाल शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक वाय.सी. गोरल सर होते व प्रमुख वक्त्या म्हणून ॲड. सरिता सतीश पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला …

Read More »

जायंट्सची मल्टी युनिट कॉन्फरन्स रविवारी

  बेळगाव : जायंट्सच्या कर्नाटक शाखा द्वारा फेडरेशन 6 ची राज्यस्तरीय मल्टी युनिट कॉन्फरन्स येत्या रविवारी महिला विद्यालय, मराठी माध्यम शाळेच्या सभागृहात संपन्न होणार आहे. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि बेळगाव सखी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परिषदेत कर्नाटकातील विविध ग्रुपचे 150 सभासद सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन …

Read More »

इंडियन बँकेच्या लॉकरमधील चोरी प्रकरणी एक अटकेत; 14 लाखाचे दागिने जप्त

  बेळगाव : शहरातील भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील इंडियन बँक शाखेच्या लॉकर मधील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आले असून त्यांनी एकाला अटक करून त्याच्याकडील 14 लाख रुपये किमतीचे एकूण 143.9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव चंद्रकांत बालाजी …

Read More »