Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

पिकाऊ शिवारातून उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या घालून शेतकऱ्यांचे नुकसान

  बेळगाव : आपला देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु कर्नाटकात प्रशासन शेतकऱ्यांच्या जणू मुळावरच उठले की काय अशी काहीशी स्थिती पाहावयास मिळत आहे. एकीकडे बायपास आणि रिंग रोड मधून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात आहेत तर दुसरीकडे पिकाऊ शिवारातून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या घालण्यासाठी प्रशासन पिकाऊ जमिनीतील रब्बी …

Read More »

संजीवीनी काळजी केंद्र म्हणजे परिपूर्ण कुटुंब – स्मिता शिरगावकर

  संजीवीनी फाउंडेशनचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बेळगाव : संजीवीनी काळजी केंद्र म्हणजे परिपूर्ण कुटुंब असून पाच वर्षांची प्रेरणादायी आणि कौतुकास्पद वाटचाल, जीव ओतून काम करणारे कर्मचारी आणि नावाप्रमाणे रुग्णांच्या आयुष्याला संजीवनी देणारी संस्था अशी संजीवीनीची ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या उगार साखर कारखान्याच्या स्मिता शिरगावकर यांनी आपल्या …

Read More »

‘व्हॅलेन्टाईन डे’मुळे तरुणाईचा उत्साह दुणावला

  प्रेमाच्या उत्सवाने बाजारपेठेत रंगत; दुकानांमध्ये भेटवस्तूंची रेलचेल निपाणी (वार्ता) : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या सप्ताहाला शनिवार (ता. ७) पासून सुरवात झाली आहे. प्रत्येक ‘डे’ निमित्ताने प्रियजनाला काय भेट द्यायचे, याचे नियोजन तरुणाईने केलेआहे. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल काही अंशी वाढलेली दिसून येत आहे. सप्ताहाला प्रारंभ झाल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. …

Read More »

मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजन संदर्भात उद्या युवा समिती सीमाभागची बैठक

  बेळगाव : मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजन संदर्भात उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने सायंकाळी ४-०० वाजता मराठा मंदिर येथे बैठक बोलविण्यात आली आहे तरी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी …

Read More »

शरद पवारांची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल केले जाणार

  पुणे : खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार सध्या बारामतीत आहेत. बारामतीतून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले जात नव्हते. आज मात्र त्यांना जास्त त्रास झालेला आहे. त्यांना ताप, खोकला आणि कफ असल्याचे सांगण्यात …

Read More »

बदला घेण्याच्या उद्देशाने सरकारी अधिकाऱ्यानेच महिला अधिकाऱ्याच्या घरात गुप्त कॅमेरे बसवले!

  बेळगाव : माळमारुती पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या महिला अधिकाऱ्याच्या घरात बल्ब होल्डरमध्ये छुपे कॅमेरे बसवून ब्लॅकमेल प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. या दुष्कृत्यामागे एक सरकारी अधिकारीच मुख्य सूत्रधार असून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, व्यावसायिक मतभेदांमुळे महिला अधिकाऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने छुपा (गुप्त) कॅमेरा बसवण्याचा कट …

Read More »

हवामान व पाऊस याबाबतीत भारत सुदैवी देश : के. एल. मजूकर

  बेळगाव : सर्व हवामानाची विविधता ही फक्त आपल्या देशातच दिसते त्यामुळे हवामान व पाऊस याबाबतीत भारत सुदैवी देश आहे असे प्रतिपादन बी. के. मॉडेल हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. एल. मजूकर यांनी केले. बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘भारताचे हवामान’ या …

Read More »

चिक्कोडी – बेळगाव मार्गावर बस-दुचाकीचा अपघात महिलेचा जागीच मृत्यू

  बेळगाव : मागून येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिल्याने एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिक्कोडी- बेळगाव मार्गावरील संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमीनभावी गावाजवळ घडली. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पा गावातील सुवर्णा मोने (३७) असे मृत महिलेचे नाव असून त्या अरिहंत संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या आणि दुचाकीवरून बेळगावकडे येत …

Read More »

आंबेवाडी गावात शिवछत्रपतींच्या मूर्तीची ऐतिहासिक प्रतिष्ठापना

  बेळगाव : आंबेवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्री. संभाजी भिडे गुरूजी यांच्या पवित्र हस्ते विधीवत पार पडली. मंत्रोच्चार, वैदिक विधी आणि भक्तिभावाने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला. या भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याला माजी आमदार श्री. संजय पाटील, माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष …

Read More »

सीमाप्रश्नी सह्यांची मोहीम राबवून सर्वोच्च न्यायालयाला जागे करू : मधुकर भावे

  बेळगाव : सीमाप्रश्नी सीमावासीय गेली 70 वर्षे लढा देत आहेत. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असताना 2004 साली सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. मात्र 24 वर्षे लोटली तरी देखील हा खटला अद्याप पटलावर आलेला नाही. सदर खटल्याला गती देण्यासाठी संपूर्ण सीमाभागातून सह्यांची मोहीम राबवून त्याची …

Read More »