Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

मणतूर्गा गावानजीक चारचाकी वाहनावर अज्ञाताकडून दगडफेक….

  खानापूर : मणतूर्गा गावानजीक सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याने मणतूर्गा भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना कळविताच तात्काळ पोलिसांची 112 क्रमांकाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व घटनेची …

Read More »

जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी : वकिलाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील चेन्नापूर डीएलटी तांडा येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या हाणामारीत एका वकिलाच्या कुटुंबातील 9 जणांवर 20 पेक्षा अधिक जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप वकिलाने केला आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर केल्याचे समजते इतकेच नाही …

Read More »

बनावट गुणपत्रिकांचे जाळे : तीन आरोपीना अटक; बेळगावचा आणखी एक आरोपी फरार

  बंगळूर  : कर्नाटक राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या नावाने सरकारकडून मान्यता न घेता दहावी आणि बारावीच्या बनावट गुणपत्रिकांचे वितरण करून फसवणुक करणारे जाळे उघड करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रशांत गुडुमी उर्फ ​​प्रशांत (वय ४१) रा. चैतन्यनगर, धारवाड, मोनिष (वय ३६) रा. श्रीनिवासनगर, बनशंकरी …

Read More »

हनीट्रॅप प्रकरण : राजण्णा यांनी उच्चस्तरीय चौकशीची केली मागणी

  बंगळूर : सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी मंगळवारी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना भेटून हनीट्रॅप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनंती केली, ज्यामुळे केवळ राज्याच्या राजकारणातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही मोठा गोंधळ उडाला आहे. आज संध्याकाळी बंगळुरातील सदाशिवनगर येथील गृहमंत्री परमेश्वर यांच्या निवासस्थानी भेट देऊन राजण्णा यांनी हनी ट्रॅपच्या …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

  नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्ली येथे भेट घेतली आणि राज्यात सुरू असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत दीर्घ चर्चा केली. भेटीनंतर बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांची …

Read More »

बेळगाव शहरासह खानापूर तालुक्यात वळीवाची हजेरी…

बेळगाव : मंगळवारी संध्याकाळपासून बेळगाव शहरात पावसाच्या सरी बरसल्या. काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना वळीवाच्या पावसाने गारवा अनुभवायला मिळाला. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर जोरात वारा वाहू लागला आणि संध्याकाळनंतर पावसाच्या हलक्या सरींनी सुरवात झाली. वाढती उष्णता आणि तीव्र पाणी टंचाई पाहता बेळगावकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला …

Read More »

न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

  बेळगाव : न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी हा परिसर सध्या कचऱ्याचा अड्डा बनला आहे. या भागात असलेल्या खुल्या जागेत स्थानिक रहिवाशी व दुचाकीस्वार कचरा टाकतात त्यामुळे न्यू शिवाजी कॉलनी येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. सदर ठिकाणी कचरा, शिळे अन्नपदार्थ, प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचरा रस्त्यावर फेकला गेल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली …

Read More »

इंद्रप्रस्थ नगर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी

  बेळगाव : इंद्रप्रस्थ नगर येथील एका अपार्टमेंट परिसरात सकाळी ५:३० वाजता भटक्या कुत्र्यांनी दोन सिक्युरिटी गार्ड्सवर हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यात नारायण पार्सेकर रा. आनंदनगर वडगाव, तसेच तुरब देसाई रा. आंबेडकर नगर, अनगोळ येथील दोघांच्या पायांवर चावल्याने जखमेतून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध अवस्थेत पडले. घटनेनंतर जखमींना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात …

Read More »

कोरटकरला तीन दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टाबाहेर येताच शिवप्रेमी अंगावर धावून गेले

  कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरची सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. कोल्हापूर कोर्टात …

Read More »

वैजनाथ मंदिराचे पुजारी प्रमोद बर्वे यांची आत्महत्या

  बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड महाराष्ट्र) जवळील श्री वैजनाथ मंदिराचे पुजारी 32 वर्षीय प्रमोद प्रभाकर बर्वे (रा. देवरवाडी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुजारी बर्वे यांनी गेल्या बुधवारी 18 मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान …

Read More »