निपाणी (वार्ता) : माजी खासदार व डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने माजी मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शहराच्या विकासासाठी पुन्हा अडीच कोटीचा निधी मंजुर झाल्याची माहिती श्री हालशुगर साखर कारखान्याचे संचालक व बोरगाव येथील नगरसेवक शरदराव जंगटे यांनी दिली. बोरगाव येथे आयोजित …
Read More »भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने म्हाकवे येथील दुचाकीस्वार ठार
निपाणी (वार्ता) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.१२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ साताप्पा चौगुले (वय २५ रा. महाकवे ता.कागल) असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून सौरभ चौगुले हा आपल्या दुचाकीवरून येथील हालसिद्धनाथ …
Read More »जिजाऊ महिला मंडळ कंग्राळ गल्ली यांच्या वतीने महिला दिन
बेळगाव : बेळगाव येथील कंग्राळ गल्ली जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून शोभा लोकुर उपस्थित होत्या. सुरुवातीस सर्व उपस्थितांचे स्वागत करून उपाध्यक्षा अनिता शंभूचे यानी प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन आणि राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई …
Read More »श्री दत्त पद्मनाभ पीठात ‘श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव’ उत्साहात संपन्न
खानापूर : श्री दत्त पद्मनाभ पिठाधीश्वर, अध्यात्म शिरोमणी, पद्मश्री विभूषित, गोवा स्वामी, प पू.सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत समाज खानापूर विभागाच्या वतीने गोवा राज्यातील कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठात श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात सद्गुरुंची पाद्यपूजा …
Read More »“मराठी सन्मान यात्रे”त मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; तालुका म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या माध्यमातून होणाऱ्या “मराठी सन्मान यात्रा” यशस्वी करण्यासाठी रविवार दिनांक १५ मार्च रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता राजहंसगड ते येळ्ळूर होणाऱ्या यात्रेमध्ये तसेच पुढील टप्प्यातील होणाऱ्या या यात्रेमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व …
Read More »काम चालू, रस्ता बंद असल्याने मांगुर फाटा, मुरगुड रोडवर वाहतुकीची कोंडी
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा परिणाम; नागरिकासह वाहनधारकांचा फेऱ्याने प्रवास निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळुर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील मुरगुड रोडवरील भुयारी मार्गाची एक बाजू आठवड्यापासून बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय मांगुर फाटा जवळ यमगर्णी नदी पुला शेजारी काम सुरू असल्याने दोन्ही ठिकाणी दुसऱ्या विरोधी बाजूने दुहेरी …
Read More »सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात 3.07 कोटींची विक्रमी देणगी
बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्रासह गोवा राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर भाविकांच्या वाढत्या ओघामुळे भक्तांनी देवीचरणी अर्पण केलेल्या देणगीने नवा विक्रम प्रस्थापित केला असून यावर्षी मंदिराच्या दानपेटीत 3 कोटी हून अधिक रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने जमा झाले आहेत. मागील चार दिवसांपासून मंदिरातील दानपेटीची मोजदात सुरू आहे. …
Read More »कलिंगड, द्राक्षांची आवक होऊनही दरवाढीमुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ
निपाणी (वार्ता) : यावर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी निपाणी बाजारपेठेत कलिंगड आणि द्राक्षांची आवक वाढत आहे. तरीही दरवाढ असल्याने ग्राहकांनी त्यांच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. सध्या कलिंगड आकारानुसार ५० ते १५० रुपये तर द्राक्ष प्रतिकिलो २६०ते २८० किलोप्रमाणे विक्री होत आहे. उन्हाळा …
Read More »मालमत्तेच्या हव्यासापोटी प्रियकराकडून प्रेयसीचा गळा दाबून खून
अथणी : मालमत्तेच्या हव्यासापोटी प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना अथणी शहरात उघडकीस आली आहे. सुजाता पवार (वय 34) असे मृत महिलेचे नाव असून मालमत्ता हडपण्याचा उद्देशाने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अथणी येथील रहिवासी सुजाता यांचा मृतदेह प्रदीप गुंडा यांच्या उसाच्या शेतात 5 …
Read More »‘दावत-ए-इफ्तार’मध्ये बंधुभावाचे दर्शन
सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यातर्फे आयोजन, हिंदू-मुस्लिम बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त येथील दर्गाह गल्लीमध्ये बोरगावमधील सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यातर्फे रमजान निमित्त दावत-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. १२) सायंकाळी मशीद समोर झालेल्या या कार्यक्रमाला हिंदू-मुस्लिम समाजबांधव उपस्थित राहून बंधुभावाचे दर्शन घडवले. रमजान महिन्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta