ठाण्यात निधन झाल्याने निपाणी परिसरात हळहळ निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी दादासाहेब उर्फ गो. श्री.पंतबाळेकुंद्री यांचे सोमवारी (ता.१६ ) ठाणे येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिजीत आणि विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्यावर …
Read More »सासरच्या जाचाला कंटाळून कुन्नूरमधील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
निपाणी (वार्ता) : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुन्नूर (ता. निपाणी) येथे शनिवारी रात्री (ता.१४) उघडकीस आली. प्रेरणा सौदागर जिरगे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येबाबतची माहिती मयत प्रेरणा जिरगे हिचे वडील प्रवीण कृष्णात कांबळे (रा. रांगोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यांनी निपाणी …
Read More »कागलचे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे पर्यावरण जागृतीबद्दल निपाणीतील नामदेवराव चौगुले सन्मानित
निपाणी (वार्ता) : निपाणीतील रहिवासी, पर्यावरण प्रेमी शिक्षक आणि भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीचे कार्य करत आहे. या कार्याची दखल घेत अखिल कर्नाटक साहित्य परिषदेचा राज्य पुरस्कार देऊन मानेवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन कागल येथील …
Read More »सातवीचा निरोप समारंभ व दात्यांचा सत्कार उत्साहात
मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात शाळेला मदतीचा हात देणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेत विशेषतः पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बेंच मोठी कमतरता होती. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून अभ्यास करावा लागत होता. विशेषतः …
Read More »कृतीशील मराठा समाजाची उद्या महत्वपूर्ण बैठक
बेळगाव : या पत्रकाद्वारे कळविण्यात येतं आहे की, कृतीशील मराठा समाजाची बैठक मंगळवारी दिनांक 17 मार्च 2026 रोजी जत्ती मठ बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता बोलविण्यात आली आहे. मराठा समाजा समोरील विविध आव्हाने आणि मराठा समाजातील होतकरू तरुणांसाठी मराठा संस्थेत उपलब्ध होण्याऱ्या संधी हे बैठकीचे प्रामुख्याने विषय असतील असे …
Read More »ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी हिरव्या मक्यासह कडब्याच्या खरेदची लगबग
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात खरीप हंगामात अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. यामुळे मक्याच्या हिरव्या चाऱ्यासह ज्वारीचा कडबा खरेदी करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा हिरवा चारा उपलब्ध नसल्याने मक्यासह …
Read More »ओडिशा येथील हॉस्पिटलमध्ये अग्नीतांडव, १० रुग्णांचा होरपळून मृत्यू
कटक : ओडिशामध्ये मोठी दुर्घटना घडली. हॉस्पिटलला आग लागल्यामुळे १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ओडिशाच्या कटकमध्ये घडली. सोमवारी मध्यरात्री एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला अचानक आग लागली. या आगीमध्ये अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग कशी लागली यामागचे कारण शोधले जात आहे. तर …
Read More »“मराठी सन्मान यात्रा” महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणारी : नंदकुमार गोरुले
मराठी सन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकातून सुरुवात येळ्ळूर : जगाच्या इतिहासात 69 वर्षे चालणारा लढा मी आजपर्यंत पाहिला नाही, सीमा लढा हा विलक्षण असा लढा आहे, आपल्याला न्याय हक्क मिळत नसेल तर तो खेचून आणला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्यामुळे मराठी अस्मिता आजही जिवंत आहे. येळ्ळूर हे महाराष्ट्र …
Read More »दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
निपाणी (वार्ता) : दुचाकीवरून ताबा सुटल्याने दुभाजकाला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वडणगे, पाडळी (ता. करवीर) येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दत्तात्रय परसू पाटील (वय ५१) असे त्याचे नाव आहे. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दत्तात्रय …
Read More »लग्नकार्य आटोपून गावाकडे परततांना दुचाकीवरून पडून कुर्लीतील महिला ठार
निपाणी : कागल महामार्गावरील लक्ष्मी टेकडी ते कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत हुपरी रोड मार्गावर कोल्हापूर ऑक्सिजन कारखान्यासमोर असलेल्या गतिरोधकावरून दुचाकी आदळल्याने महिला ठार झाली. वासंती राजेंद्र पाटील (वय ४५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती राजेंद्र ईश्वर पाटील हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता.१४) दुपारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta