मध्य आफ्रिकन रिपब्लिकच्या राजधानीतील एका शाळेत गुरुवारी स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २९ मुलांचा मृत्यू झाला. तर २६० जण जखमी झाले. बुधवारी बांगुई येथील बार्थेलेमी बोगांडा हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये एका बिघाड झालेल्या ट्रान्सफॉर्मरला वीजपुरवठा केला जात असताना हा स्फोट झाला. आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, …
Read More »आमदार आसिफ सेठ यांनी केला शहराचा पाहणी दौरा…
बेळगाव : बेळगावात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शहराचा पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार आसिफ सेठ यांनी आज बेळगावातील किल्ला तलाव, अमन नगर, महावीर नगर आणि पंजी बाबा परिसरात भेट देऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी …
Read More »विद्युत तारा शेडवर पडून तीन म्हशी आणि घोड्याचा मृत्यू
बेळगाव : मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे विद्युत तारा पडून तीन म्हशी आणि एका घोड्याचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील अरळीमट्टी गावात ही घटना घडली. गावातील शंकर समगार यांच्या म्हशी आणि घोडा एका शेडमध्ये बांधलेल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या आणि गुरांवर पडल्या. या प्रकरणात, तीन म्हशी आणि …
Read More »कृष्णा नदीत १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग: पुराची भीती
बेळगाव : कृष्णा नदीत १,०८,७२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदी धोक्याच्या पातळीच्या पलीकडे वाहत आहे. यामुळे नदीकाठावरील भागात पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. पश्चिम घाट क्षेत्रात भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात कृष्णा नदी वाहत असल्याने लोक भीतीच्या छायेखाली आहेत. महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजमधून कर्नाटकातील कृष्णा, …
Read More »शिक्षणमहर्षी कै. श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या स्मृतिदिनी मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन!
बेळगाव : सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मराठा मंडळ शिक्षण संस्थेतर्फे आंतरशालेय भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मराठा मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव, येथे करण्यात आले आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे तात्कालिन अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. श्री नाथाजीराव हलगेकर यांचा 22 जूलै हा स्मृतीदिन “शैक्षणिक उपक्रम दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा …
Read More »महाराष्ट्रातील आरोग्य योजना सीमाभागालाही देणार
कोल्हापुरचे पालकमंत्री आबिटकर; निपाणीस सदिच्छा भेट निपाणी (वार्ता) : सीमाभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कट्टीबद्ध आहे. महाराष्ट्र सरकारने विविध प्रकारच्या आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ सीमा भागातील नागरिकांना घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आबिटकर यांनी निपाणीस सदिच्छा …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील १८ पूल पाण्याखाली; बेळगाव जिल्हा पुराच्या छायेत..
बेळगाव : पश्चिम घाट आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे, परिणामी, बेळगाव जिल्ह्यातील सात नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत. बेळगाव जिल्ह्यात पूर येण्याचा धोका आहे. कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा, हिरण्यकेशी यासह बहुतेक नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत आणि जिल्ह्यातील १८ पूल पाण्याखाली गेले आहेत. आज एकाच दिवसात ८ …
Read More »अंमली पदार्थ सेवन -तस्करी विरोधात जनजागृती रॅली संपन्न
बेळगाव : बेळगाव येथील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहकार्याने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) आणि अन्य संघटनांतर्फे 26 जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिनानिमित्त आज गुरुवारी सकाळी आयोजित जनजागृती रॅली उस्फूर्त प्रतिसादात पार पडली. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून सदर …
Read More »सार्वजनिक वाचनालयतर्फे राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती साजरी
बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुरुवार दि. 26 जून 2025 रोजी राजर्षी शाहु छत्रपती महाराज यांची 151 जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अध्यक्ष अनंत लाड आणि कार्यवाह सुनिता मोहिते यांनी राजर्षी …
Read More »यंदापासून सीबीएसईची दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) दहावीची परीक्षा या शैक्षणिक वर्षापासून दोनदा होणार असून फेब्रुवारी व मे अशा दोन संधी विद्यार्थ्यांना एका वर्षांत मिळतील. फेब्रुवारीत होणारी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. फेब्रुवारीतील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि गुण सुधारायचे असतील अशा विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेची संधी मिळणार आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta