Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती

  नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि कसाबला फासावर लटकावण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे. अधिकृत घोषणा रविवारी सरकारी अधिसूचनेद्वारे करण्यात आली. 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी श्रृंगला यांनी यापूर्वी बांगलादेशातील उच्चायुक्तांमध्ये भारताचे …

Read More »

निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्त्वाची बैठक

  निपाणी : म. ए. समिती निपाणी व म.ए. युवा समिती निपाणी यांचे वतीने सीमाप्रश्नासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक मराठा मंडळ निपाणी येथे बोलविण्यात आलेली आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, नेमलेल्या उच्चाधिकार समिती सदस्यांची भेट व पुढील कार्यवाही या संदर्भात …

Read More »

रोटरी दर्पणच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

  रोटरियन अ‍ॅड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांची अध्यक्षपदी निवड बेळगाव : २०२५ – २६ रोटरी वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा कोल्हापूर सर्कलजवळील हॉटेल लॉर्ड्स येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात रोटरियन अ‍ॅडव्होकेट विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकारिणीत रोटरियन कावेरी करुर यांची सचिव तर रोटरियन सुरेखा मुम्मिगट्टी या कोषाध्यक्षा …

Read More »

कै. बी. एस. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राकसकोप येथे शोकसभा

  बेळगाव : राकसकोप येथील रहिवाशी कै. श्री. बाबुराव साताप्पा पाटील उर्फ बी एस पाटील यांचे बुधवार दिनांक 9 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै बी एस पाटील हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. ते मराठा बँकेचे माजी …

Read More »

निलजी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत युवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्याकडून 12जुलै रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी येथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, संघटनेची स्थापना झाल्यापासून बेळगाव जिल्ह्यातील विविध मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहोत. यामागे …

Read More »

कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागची बैठक

  सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार बेळगाव : म. ए. युवा समिती सिमाभागची बैठक जत्तीमठ येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते. कन्नड प्राधिकरणाची बैठक घेऊन मराठीसह इतर भाषा काढून फक्तच कन्नड भाषेच्या पाट्या सर्व सरकारी ठिकाणी लावण्याच्या निर्णयाचा …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील पायउतार; शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात माळ

  मुंबई : अखेर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या पदावरून निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यामागील कारण त्यांनी कधी समोर आणले नाही. पण नवीन उमद्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यापूर्वी मांडले होते. राष्ट्रवादी फुटल्यानंतर जयंत पाटील …

Read More »

म. मं. ताराराणी कॉलेज खानापूर येथे पालक चिंतन सभा संपन्न!

  खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे दिनांक 4 जुलै 2025 रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक चिंतन सभा संपन्न झाली. बदलत्या काळानुसार इयत्ता बारावी वार्षिक परीक्षेचे बदललेले स्वरूप समजावून घेण्यासाठी शिवाय बोर्ड परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सदर चिंतन सभेचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत विद्यार्थीनीनी …

Read More »

सरकारी शाळेतील मुलांसाठी मोफत बस प्रवास

  डी.के. शिवकुमार; केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याना लाभ बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सरकारी शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील मुलांना शाळांमध्ये जाण्यासाठी मोफत बस सुविधा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करत घोषणा …

Read More »

युवा समिती बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : आज शनिवार दि. 12/07/2025 रोजी सावगाव शाळेत युवा समिती बेळगाव यांच्या वतीने इयत्ता 1 लीच्या सर्व तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याने मुलांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. यावेळी युवा आघाडी सावगावचे अध्यक्ष श्री. यल्लाप्पा मा. पाटील, शाळेचे एसडीएमसी …

Read More »