Saturday , November 7 2026
Breaking News

Belgaum Varta

हिप्परगी बॅरेजच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर : जिल्हाधिकारी

  बेळगाव : कृष्णा नदीच्या प्रवाहामुळे हिप्परगी बॅरेजचा दरवाजा निखळल्याने तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. यामुळे पाणी वाया जात असल्याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, “हिप्परगी बॅरेजच्या दरवाजा क्रमांक २२ चे नुकसान झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या मुख्य …

Read More »

बेळगावात प्रवासी रिक्षांना मीटरची सक्ती; दोन महिन्यांची अंतिम मुदत

  बेळगाव : बेळगाव शहरात प्रवासी सेवा देणाऱ्या सर्व रिक्षांना येत्या दोन महिन्यांच्या आत मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रिक्षाचालक आणि संबंधित विभागांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीत …

Read More »

मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील विक्रम इनामदार यांच्या मालकीच्या इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण आठ कामगार गंभीर भाजले गेले होते. त्यापैकी अक्षय तोपडे, दीपक मन्नोळी आणि सुदर्शन या तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित पाच जखमींवर बेळगाव येथील …

Read More »

निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमोल नागराळेंची निवड

उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे; तीनही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे मंगळवारी येथील श्रीपेवाडी रोडवरील व्हीएसएम शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या संयुक्तिमाने पत्रकार दिन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती झाली. यावेळी झालेल्या बैठकीत गतवर्षीच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन यंदा अमोल नगराळे यांची फेरनिवड, उपाध्यक्षपदी …

Read More »

मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावरील चाकू हल्ला प्रकरणी चौघांना अटक

  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे कारचालकाचा जीव बचावला बेळगाव : मंगळवारी दुपारी क्लब रोड येथे घडलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावरील चाकू हल्ला प्रकरणात चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे कार चालकाचा जीव वाचला असल्याचे समजते. जखमी बसवंत याचा मित्र मदन …

Read More »

बोरगाव आर. के. नगरमध्ये कुपनलिका खुदाईचा प्रारंभ

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील प्रभाग क्रमांक ५ मधील आर.के. नगरमध्ये उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कुपनलिका खुदाईचा प्रारंभ सहकाररत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपस्थित होते. उत्तम पाटील यांनी,नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामांना सातत्याने चालना देण्यात येत आहे. जनतेच्या हितासाठी विकासाची कामे …

Read More »

श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूलला अरिहंत उद्योग समूहातर्फे १ लाखाचा मदत निधी

  निपाणी (वार्ता) : श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूल शिक्षण संस्थेच्या संगणक व कार्यालयीन इमारतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले होते. या दुर्दैवी घटनेवेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी भेट देऊन शाळेस मदतीची जाहीर घोषणा केली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.६) प्रत्यक्ष वचनपूर्ती करत अरिहंत सभागृहात त्यांच्या हस्ते शाळेच्या संचालक …

Read More »

पत्रकार दिनी कु. अवनी अर्जुन जाधवचा “कला रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित

  ठाणे : सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्ताने पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि करण्यासाठी आपल्या हातांना बळ देऊ पाहणारया पत्रकार, साहित्यिक, कलावंत, खेळाडू यांच्या अनेक पत्रकार संघ, संस्था, संघटना, महापालिका आणि …

Read More »

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील

  चंदगड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदासाठी संतोष सावंत भोसले (संपादक -चंदगड टाईम्स) तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील (संपादक -सत्यघटना) यांची सन २०२६-२०२७ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण व पत्रकार दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमानंतर …

Read More »

ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी

  बेळगाव व गोव्यातील काता – कुमिते स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश बेळगाव : ए.व्ही. कराटे ॲकॅडमीची उदयोन्मुख खेळाडू व समाजसेविका सौ. माधुरी जाधव (पाटील) यांची कन्या कु. सृष्टी स्वप्नील जाधव हिने राष्ट्रीय व आंतरराज्यीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. दि. २१ डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित …

Read More »