Thursday , June 4 2026
Breaking News

निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमोल नागराळेंची निवड

Spread the love

उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे; तीनही निवडी बिनविरोध

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे मंगळवारी येथील श्रीपेवाडी रोडवरील व्हीएसएम शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या संयुक्तिमाने पत्रकार दिन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती झाली. यावेळी झालेल्या बैठकीत गतवर्षीच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन यंदा अमोल नगराळे यांची फेरनिवड, उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे तर सेक्रेटरीपदी राहुल पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
तालुका पत्रकार संघाच्या गतवर्षीच्या निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांसह सुकाणू समितीच्या सदस्यांनी वर्षभर सक्रिय राहून पत्रकार संघाच्या भवनासाठी नगरपालिका प्रशासनाकडून मंजुरी मिळवली आहे. शिवाय त्याच्या बांधकामासाठी पालिकेतर्फे निधीही मिळणार आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच सदस्यांच्या सर्वानुमते वरील निवडी बिनविरोध करून नवा पायंडा रचला आहे.
नूतन अध्यक्ष अमोल नागराळे यांनी, सर्व सदस्यांच्या सहकार्याने वर्षभरात विविध उपक्रम राबवून त्याला यश मिळाले आहे. शिवाय पत्रकारावर झालेल्या अन्यायाबाबत कार्यवाहीसाठी प्रयत्न केले आहेत. या पुढील काळात ही संघाच्या प्रगतीसह पत्रकार भवनाच्या कामाच्या पूर्ततेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. सुकाणू समिती सदस्य राजेश शेडगे यांनी, सर्वांच्या सहकार्याने संघाला जागा मंजूर झाले असून निवडणुकीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आल्यावर कन्फर्मेशन घेऊन उर्वरित प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शिवाय लोकप्रतिनिधीही कार्यालय निर्मितीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. यावेळी विठ्ठल केसरकर, अमर गुरव, राहुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पांडुरंग मधाळे यांनी सूत्रसंचालन केले. रंगराव बन्ने यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मेजर प्रा. डॉ. अशोक डोनर यांची देवचंद कॉलेजच्या उपप्राचार्यपदी निवड

Spread the love    निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *