Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

अपार्टमेंटमधील कार बाहेर काढताना धडक बसून सिक्युरिटी गार्डचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : न्यू गुड्सशेड रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पार्क केलेली कार बाहेर काढताना कारच्या धडकेत सेक्युरिटी गार्डचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. मृत सिक्युरिटी गार्डाचे नाव नागेश शटुप्पा देवजी (वय 56, रा. माळी गल्ली, बेळगाव) असे आहे. रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 10.30 …

Read More »

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर माजी आमदार अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड!

  बेळगाव : मागील 20 वर्षांपासून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निर्विवाद वर्चस्व असलेले माजी आमदार अरविंद पाटील यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार व विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा विजायोत्सव …

Read More »

बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य पथसंचलन; हजारो स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

  बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बेळगाव शहरात आज शिस्तबद्ध आणि भव्य पथसंचलनाचे आयोजन केले होते. शहर परिसरातील हजारो स्वयंसेवकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सरदार हायस्कूलच्या मैदानावरून या भव्य संचलनाची सुरुवात करण्यात आली. संचलनाच्या अग्रभागी विशेषतः सुशोभित केलेल्या वाहनावर संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधवराव गोळवलकर …

Read More »

“काळा दिवस” साजरा झाल्यास बेळगावात रणांगण होईल : नारायण गौडाचे प्रक्षोभक वक्तव्य!

  बेळगाव : १ नोव्हेंबरला बेळगावमध्ये ‘काळा दिवस’ साजरा करण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसू नका. तुम्ही तुरुंगात गेलात तरी चालेल, तुम्हाला सोडवून आणायला मी आहे. ‘काळ्या दिवसाचे’ समर्थन करणाऱ्यांना सोडू नका असे प्रक्षोभक वक्तव्य कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष टी. ए. नारायणगौडा यांनी केले आहे. आज बेळगावच्या गांधी भवनात कर्नाटक रक्षण …

Read More »

बाग परिवाराचा काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न!

  बेळगाव : बाग परिवाराचा ऑक्टोबर महिन्यातील काव्यवाचनाचा कार्यक्रम आज जत्तीमठ येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा सडेकर यांनी केले. काव्यवाचन कार्यक्रमात एकापेक्षा एक दर्जेदार अशा कविता सादर झाल्या. जेष्ठ कवी निळू भाऊ नार्वेकर (फक्त एक रात्र), स्नेहल बर्डे (कोरोना), अशोक सुतार (भावना अंधश्रद्धेच्या), जोतिबा नागवडेकर (इंग्रजी), प्रतिभा सडेकर (मुलगी …

Read More »

स्वामी विवेकानंद स्मारक येथे १६ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : स्वामी विवेकानंदानी भारत भ्रमण करताना १६ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावला भेट दिली होती. तीन दिवस स्वामींचे वास्तव्य रिसालदार गल्ली येथील भाते यांच्या निवासस्थानी होते. याचे औचित्य साधून रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.   गुरुवार दि. १६ रोजी सायंकाळी …

Read More »

शेतकऱ्यांचे हित जोपासणार असाल तर प्रति टन ४ हजार रुपये दर द्या : राजू पोवार

  कर्नाटक राज्य रयत संघटनेचे बैठक निपाणी (वार्ता) : सध्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. त्याच्याशी संघटनेचा कोणताही संबंध नाही. निपाणी तालुक्यातील दोन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना सहकार्य केलेले नाही. असे असताना आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढवीत असल्याचे सांगत आहेत. हे पूर्णपणे …

Read More »

निपाणीतील जळीतग्रस्त कुटुंबीयांना अरिहंत समूहातर्फे २५ हजाराची मदत

  निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पी. बी. रोडवरील नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या उत्तम मधुकर जाधव यांच्या मालकीच्या टायर विक्री व पंक्चर दुकानाला शुक्रवारी (ता.१०) रात्री भीषण आग लागून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर सहकाररत्न उत्तम पाटील घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करण्यासह पीडित जाधव कुटुंबीयांशी संवाद साधला. …

Read More »

आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना महिलेच्या नावे अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आता या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी हा चंदगडमधीलच रहिवासी असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षभरापासून …

Read More »

पहिले कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन २ नोव्हेंबर रोजी

  कोल्हापूर (प्रतिनिधी ) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने “पहिलं कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५” रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाचा निर्णय कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. …

Read More »