बेळगाव : येळ्ळूर येथील प्रस्तावित रोप-वे (केबल कार) प्रकल्पाला लवकर मंजुरी देऊन त्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. आमदार पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन येळ्ळूर रोप-वे …
Read More »निडगल येथील सिद्धेश्वर मंदिरात तोडफोड नागरिकांचा संताप
बेळगाव : खानापूर तालुक्यातील निडगल गावचे ग्रामदैवत आणि ‘सिद्धगुंढा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव तसेच तुळशी वृंदावनाची नासधूस करण्यात आल्याने निडगलसह परिसरातील ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्रावण महिन्याच्या …
Read More »युनियन जिमखाना क्लबच्या कारभाराची आता पोलिसांकडून चौकशी
बेळगाव : युनियन जिमखाना क्लबमधील गोळीबाराच्या घटनेनंतर प्रकरण चांगलेच तापले असताना न्यायालयाच्या निर्देशानुसार क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून क्लबच्या कारभाराची पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत भरमानी भांडगी, संजय पोतदार, प्रसन्न विठ्ठलराव सुंठणकर, सुधाकर पाटणकर, संजय चव्हाण, …
Read More »डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा अभ्यासू, कायदेशीर आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख तसेच मराठी अभ्यास केंद्रचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांची घाटकोपर, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि सरचिटणीस …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांची माहेश्वरी अंधशाळेला भेट
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी ८ ऑगस्ट रोजी माहेश्वरी अंधशाळेला भेट देऊन तेथील विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणपद्धती, शिस्त, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि जिद्दीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. दृष्टी नसली तरी स्वप्नांना आणि कर्तृत्वाला कोणतीही मर्यादा नसते, याची जाणीव या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना झाली. माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी विद्यानिकेतनच्या …
Read More »जलतरण प्रशिक्षक शिवराज मोहिते यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बेळगाव : जलतरण प्रशिक्षक शिवराज मोहिते यांच्या दुःखद आणि अकाली निधनाबद्दल आबा स्पोर्ट्स क्लबतर्फे बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या जलतरण तलावात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलतरण क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक, पालक, क्रीडाप्रेमी तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसभेच्या प्रारंभी शिवराज मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …
Read More »वडगावातील मराठी मुलींच्या क्र. ५ शाळेत नूतन एसडीएमसी समितीची निवड
बेळगाव : वडगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्रमांक ५ येथे मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन शाळा अभिवृद्धी व व्यवस्थापन समितीची (SDMC) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सौ. दूर्वा हरीश देसाई यांची बिनविरोध, तर उपाध्यक्षपदी श्री. आनंद ज्योतिबा कुर्ले यांची एका मताने निवड झाली. समितीच्या सदस्यपदी …
Read More »मंगळागौरीच्या तालावर रंगला महिलांचा उत्साह!
‘सखी’च्या ‘चला खेळूया मंगळागौर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५ हून अधिक स्टॉल्स ठरले आकर्षणाचे केंद्र बेळगाव : पारंपरिक संस्कृतीचा जागर, महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ आणि महिला उद्योजिकांना व्यवसायाची नवी संधी… अशा त्रिवेणी संगमातून ‘सखी’तर्फे आयोजित ‘चला खेळूया मंगळागौर २०२६’ या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. गुजरात भवन, शास्त्रीनगर …
Read More »एसकेई सोसायटीचा संस्थापक दिन उत्साहात साजरा
बेळगाव : साऊथ कोंकण एज्युकेशन सोसायटी, बेळगावचा संस्थापक दिन आरपीडी महाविद्यालयातील के. एम. गिरी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कु. वृंदा मंजरी यांच्या मंगलमय स्वागतगीताने झाली. आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सोसायटीच्या सचिव …
Read More »सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान
बेळगाव : बेळगाव सीमाभागातील खानापूर, बेळगाव तसेच इतर भागांतून नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेल्या मराठी युवकांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागात घरोघरी जाऊन सीमाप्रश्नाबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई दौरा पूर्ण केल्यानंतर पुणे विभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta