लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज रोट्टी; लिंगायत सर्वेबाबत निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने २२-०९-२०२५ पासून कर्नाटकात सामाजिक-आर्थिक शैक्षणिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. जात जनगणना सर्वेक्षणात सुमारे ६० स्तंभ आहेत. त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती, आर्थिक स्थितीच्या तपशीलांचा समावेश आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वरांना धर्मगुरू मानणाऱ्यांनी सर्वेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ‘लिंगायत’शब्द …
Read More »युवा समितीच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन….
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली बेळगाव येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ धैर्य वाढावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्व कला जोपासावी आणि आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावेत यासाठी …
Read More »थलपती विजय चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख देणार!
दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयची तामिळनाडूमधील करूर या ठिकाणी शनिवारी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या रॅली दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास १०० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या …
Read More »१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वामी चैतन्यानंदच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
नवी दिल्ली : १७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित अध्यात्मिक स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्लीमधील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे या बाबाने लैंगिक शोषण केले. दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथीला अटक केली. दिल्ली पोलिस त्याला घेऊन बसंत कुंज पोलिस ठाण्यात दाखल …
Read More »सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी यांच्या वतीने भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत 4 व 5 ऑक्टोबरला
दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली होती. पावसातील व्यत्ययामुळे (जसे की सततचा पाऊस) रद्द करून पुढे ढकलण्यात आलेली आहे. हीच शर्यत श्री. बाळूमामा जन्मोत्सव निमित्त दिनांक …
Read More »बंगळुर – मुंबई दरम्यान सुपरफास्ट ट्रेनला मंजुरी – खासदार सुर्या
बंगळूर : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बंगळुर आणि मुंबई दरम्यान एक नवीन सुपरफास्ट ट्रेन मंजूर केली आहे, अशी माहिती खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिली. या मंजुरीमुळे दोन्ही शहरांमधील नागरिकांची ३० वर्षांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे. तेजस्वी यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे …
Read More »जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवकुमार हिरेमठ तर सचिव म्हणून मदन बामणे यांची निवड
बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी २०२५-२६ सालासाठी अध्यक्षपदी शिवकुमार हिरेमठ तर सचिव म्हणून मदन बामणे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून उमेश पाटील तर खजिनदार म्हणून संजय पाटील यांची निवड झाली आहे. …
Read More »काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला दुप्पट
कंत्राटदार संघटनेची तक्रार; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र बंगळूर : सत्ताधारी काँग्रेसच्या काळात अनेक विभागांमध्ये भ्रष्टाचार मागील भाजप राजवटीच्या तुलनेत “दुप्पट” झाला असल्याची लेखी तक्रार कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेने (केएससीए) केली आहे, हा एक खळबळजनक आरोप आहे, जो मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारसाठी धक्का ठरू शकतो. कंत्राटदार संघटनेने २५ सप्टेंबर रोजी सिद्धरामय्या …
Read More »कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात रंकाळ्यावर होड्यांच्या शर्यतीने रंगला उत्साह
कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव २०२५ च्या निमित्ताने रंकाळा तलावाच्या काठावर शनिवारी सायंकाळी पारंपरिक होड्यांच्या भव्य स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि कृष्णाई वॉटर स्पोर्ट्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेने क्रीडाप्रेमींसह हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मंत्रमुग्ध केले. रंकाळ्याच्या नयनरम्य परिसरात झालेल्या या …
Read More »हिंदवाडी महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात
बेळगाव : हिंदवाडी महिला मंडळातर्फे हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोमवार दि. 22 सप्टेंबरपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव गुरुवार दि. 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानिमित्त दररोज सकाळी आठ वाजता अभिषेक, पूजा, आरती कुमारीका पूजन असे धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने होत आहेत. तसेच दररोज सायंकाळी पाच वाजता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta