Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

हलगा – मच्छे बायपास कामाविरोधात शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र

  बेळगाव : हलगा – मच्छे बायपासच्या कामाविरोधात शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच भूसंपादन आणि अनधिकृत बांधकाम सुरू केल्याबाबत चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बायपास करण्याचा निर्णय घेतल्यापासून या भागातील शेतकरी सातत्याने कामाला विरोध करत आहेत. …

Read More »

शहाजी महाराजांच्या समाधिस्थळाच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद

  बेळगाव : अथणी शहरातील शिवाजी चौकात रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अथणी व अथणी तालुका मराठा समाज संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नव्हते. …

Read More »

आंबेवाडी गावचे जवान मयूर धूपे यांचे कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान अपघाती निधन

  बेळगाव : आंबेवाडी गावचे रहिवासी असलेले भारतीय सेनेतील जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. देशसेवेच्या कर्तव्यावर असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शहीद जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे पार्थिव उद्या सकाळी बेळगाव येथे आणण्यात येणार असून, मिलिटरी हॉस्पिटल बेळगाव …

Read More »

डॉल्फिन ग्रुपचे मास्टर्स जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी

  बेळगाव : सिंधुदुर्ग जलतरण संघटनेच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग चिवला बीच येथे सागरी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावच्या गोवावेस व अशोक नगर येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आबा स्पोर्ट्स क्लबच्या सानिध्याखाली सराव करत असणाऱ्या डॉल्फिन ग्रुपचे मास्टर्स जलतरणपटूंची उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. …

Read More »

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदा खानोलकर हिला रौप्य पदक

  बेळगाव : नुकत्याच दिनांक 12 ते 17 डिसेंबर रोजी दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात 69 व्या नॅशनल स्कूल गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू व जी. जी. चिटणीस स्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदा वैभव खानोलकर हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 4 x …

Read More »

समाज सारथी सेवा संघाची येळ्ळूरमध्ये स्थापना

  येळ्ळूर : येळ्ळूर मधील समान विचार आणि ध्येय असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक किंवा सामुदायिक समस्या सोडवण्यासाठी तसेच कल्याणकारी कार्य करण्यासाठी एक संघटित शक्ती निर्माण करण्याचा उद्देश ठेवून गावामध्ये समाज सारथी सेवा संघाची स्थापना केली आहे. संघटनेच्या माध्यमातून सामूहिक ध्येय साध्य करणे, समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे …

Read More »

बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासावर भर द्या : आम. अभय पाटील

  बेळगाव : बेळगाव सीमावर्ती भाग असूनही गेल्या 50 वर्षांपासून सर्वच सरकारांनी या शहराकडे दुर्लक्ष केले आहे. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज विधानसभेत करून सरकारचे लक्ष वेधले. आज विधानसभेत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, बेळगाव सीमावर्ती भागात असल्याने …

Read More »

कर्नाटक बालविकास अकादमीचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात

  बेळगाव : “मुलांवर कोणताही अनावश्यक दबाव न टाकता त्यांच्या आवडीच्या निवडीला पालकांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मात्र, त्याच वेळी पालकांची स्वप्ने पूर्ण करणे हे देखील मुलांचे कर्तव्य आहे,” असे मत महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. सुवर्ण विधानसौध सभागृहात कर्नाटक बालविकास अकादमीच्या पुरस्कार वितरण समारंभात त्या …

Read More »

दोनच दिवसात अलंग, मदन कुलंगा किल्ला सर

  बेनाडी ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या; आजपर्यंत ६८ किल्ल्यांची भ्रमंती निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील व लखन माळी यांच्यासह सदस्यांनी महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर ४ हजार ८०० फुटावर असलेल्या अलंग, मदन, कुलंग (एएमके) हे तीन किल्ले केवळ दोन दिवसात सर करण्याचा उपक्रम राबविला. हे …

Read More »

कॅपिटल वन 14 वी एकांकिका स्पर्धा 20 व 21 डिसेंबर रोजी

  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेतर्फे सलग 14 वर्षी भव्य एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्नाटक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यामधील संघांची अभासी तत्वावर निवड करून दिग्गज संघांचा समावेश या आंतरराज्य स्पर्धेमध्ये करण्यात येणार आहे. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्सहन देण्यासाठी बेळगांव जिल्हा मर्यादित शालेय गटामध्ये देखील स्पर्धा भरविण्यात …

Read More »