Thursday , August 20 2026
Breaking News

बेळवट्टी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए. आर. नंदिहळ्ळी यांचा सन्मान

Spread the love

 

बेळवट्टी…… येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून रुजू झालेल्या ए. आर. नंदिहळ्ळी यांचा माजी विद्यार्थी १९९९ च्या बॅच मधील विद्यार्थ्यांकडून सन्मान करण्यात आला त्या यापूर्वी या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. बेळगुंदी प्राथमिक शाळेतून या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून बढती मिळाली आहे. अशा विद्यार्थी प्रिय शिक्षिका पुन्हा या शाळेत आल्याबद्दल पालक व विद्यार्थी वर्गात समाधान व्यक्त केले
माजी विद्यार्थ्यांतर्फे शाल, पुष्पगुच्छ श्रीफळ भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी आर. एम. कांबळे यांनी गौरवोद्गार विचार व्यक्त करुन शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका दीपा चांदिलकर, एस एम मुळेराखी तसेच माजी विद्यार्थी रमेश चौगुले, राजेंद्र नलावडे, सागर चौगले, सोमनाथ गायकवाड, हणमंत पाटील, लक्ष्मण चिरमुरकर, सागर गाडेकर, यशवंत पाटील, गीतांजली चांदीलकर उपस्थित होते.
यावेळी औचित्य साधून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले
प्रास्ताविक दत्तात्रय गुरव, आभार अशोक जेलुगडेकर, तर
सूत्रसंचालन पुंडलिक मंडोळकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

हिंडलगा कारागृहात वेश्याव्यवसाय आणि अवैध धंदे; तरुणाकडून पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *