Wednesday , August 19 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल; अशोका बिल्डकॉन कंपनीकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर ग्रामस्थांनी काल प्रशासन आणि अशोका बिल्डकॉन कंपनीकडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तसेच वाहतुकीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविषयी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार अशोका बिल्डकॉन कंपनीने आजपासून रस्त्याच्या दुरुस्ती व विकासकामाला सुरुवात केली आहे.

रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनीने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले आहे. त्यामुळे काम सुरू असतानाही वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाहतुकीची कोंडी यामुळे येळ्ळूर परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत कंपनीकडे आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत अशोका बिल्डकॉन कंपनीने काम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे तसेच पर्यायी मार्गाची प्रभावी व्यवस्था करून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासन आणि कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात; कन्नड साहित्यिकांच्या पत्नीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी 25 हजारांची मदत

Spread the love  येळ्ळूर : जात, धर्म आणि भाषेच्या भिंती बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीला धावून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *