Wednesday , August 19 2026
Breaking News

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून निर्घृण खून

Spread the love

 

अथणी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अथणी तालुक्यातील कटगेरी गावात रविवारी घडली.

मृत महिलेची ओळख शोभा परगोंड सारवाड अशी झाली असून, आरोपी पती परगोंड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शोभा आणि परगोंड हे मूळचे अथणी तालुक्यातील खवटखोप्प गावचे रहिवासी आहेत. गेल्या काही काळापासून ते रोजगारानिमित्त अवजीकर मठ येथे वास्तव्यास होते. शोभा मठात स्वयंपाकाचे काम करत होती, तर परगोंड चालक म्हणून कार्यरत होता.

दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद आणि पत्नीवर संशय घेण्याच्या कारणावरून वारंवार भांडणे होत होती. याच संशयातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे कटगेरी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *